थकहमीच्या कारखान्यांमध्ये निम्मे लाभार्थी भाजपचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 06:32 AM2020-09-24T06:32:05+5:302020-09-24T06:32:15+5:30

३२ कारखान्यांना मदत : ३९२ कोटींचा मिळणार ‘बूस्ट’

BJP half beneficiaries in exhausted factories! | थकहमीच्या कारखान्यांमध्ये निम्मे लाभार्थी भाजपचे!

थकहमीच्या कारखान्यांमध्ये निम्मे लाभार्थी भाजपचे!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य सरकारने अडचणीतील ३२ सहकारी साखर कारखान्यांना ३९२ कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय घेतला असून, त्यातील निम्मे म्हणजे १५ कारखाने हे भाजपच्या नेत्यांचे आहेत. या कारखान्यांना १६७ कोटी ३६ लाखांची थकहमी मिळाली आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीच्या
नेत्यांच्या आठ, काँग्रेसच्या पाच व शिवसेनेच्या दोन आणि एका अपक्ष नेत्याच्या कारखान्यास ही रक्कम मिळणार आहे.


यंदा राज्यात उसाचे उत्पादन चांगले असल्याने हे कारखाने बंद राहिले तर शेतकऱ्यांचे पीक शेतात पडून राहील व नंतर उभ्या उसाला भरपाई देण्याची वेळ सरकारवर येऊ शकते; त्यापेक्षा थकहमी देऊन कारखाने सुरू केलेले बरे, असा विचार करून राज्य सरकारने ते कारखाने कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचे आहेत, याचा विचार न करता ही थकहमी दिली आहे.


सर्वाधिक ३० कोटींची थकहमी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील संत दामाजी साखर कारखान्यास मिळणार असून, सर्वांत कमी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या रेणुकादेवी शरद कारखान्यास एक कोटी १८ लाख रुपयांची मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील विठ्ठल साई साखर कारखान्यास शासनाने थकहमी दिली आहे; पण त्याची रक्कम जाहीर केलेली नाही.


कारखानानिहाय थकहमी कोटींमध्ये...
भाजप १५ : शंकरराव कोल्हे, कोपरगाव- १३.६६, श्रीवृद्धेश्वर अहमदनगर- ९.२४, विखे पाटील, अहमदनगर- २२.५०, वैद्यनाथ, बीड - १०.७७, जयभवानी, बीड - ०५.६०, टोकाई, हिंगोली- ०४.८९, निरा भीमा इंदापूर, पुणे- ११.९०, किसन वीर भुर्इंज, सातारा- १५.७६, किसन वीर खंडाळा, सातारा- ०७.१२

राष्ट्रवादी ०८
कुकडी, अहमदनगर- १८.००, सुंदरराव सोळंके, बीड - १४.४७, रावसाहेब पवार, घोडगंगा, पुणे- १३.६३, मोहनराव शिंदे, सांगली- ०९.०२, छत्रपती भवानीनगर, पुणे- १८.७५, बाबासाहेब आंबेडकर, उस्मानाबाद- ०८.४३, विठ्ठल, पंढरपूर- १५.१०, संत दामाजी मंगळवेढा - ३०.००.

काँग्रेस ०६
भाऊराव चव्हाण, नांदेड- १२.१२, भाऊराव चव्हाण, हिंगोली- ०५.५४, विघ्नहर, पुणे- २४.००, राजगड पुणे - १०.००, शिवसेनेचे कारखाने- ०२, कुंभी-कासारी, कोल्हापूर- १७.५६, हुतात्मा किसन अहिर, सांगली- १८.००.
अपक्ष १ । रेणुकादेवी शरद कारखाना, पैठण : ०१.१८.

Web Title: BJP half beneficiaries in exhausted factories!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.