शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

Gopichand Padalkar : "सत्ता गेली पण माज जात नाही"; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर जोरदार घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 18:33 IST

BJP Gopichand Padalkar Slams Jayant Patil : जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावरून भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. "सत्ता गेली पण माज जात नाही" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदी भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतांसह विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकरांनी आजवर केलेल्या कामांचा दाखला दिला. याच दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी नरहरी झिरवळ यांच्या कामाचं कौतुक केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी "आदिवासी असून देखील नरहरी झिरवळ यांनी चांगलं काम केलं" असं विधान केलं.

जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावरून भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. "सत्ता गेली पण माज जात नाही" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर (BJP Gopichand Padalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आदिवासी असूनही चांगलं काम केलं या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रुजलेला आहे. मी तमाम दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त बांधवांच्या वतीने या विधानाचा जाहीर निषेध करतो. सत्ता गेली पण माज जात नाही" असं पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 बाळासाहेब थोरात (Congress Balasaheb Thorat) यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना (BJP Devendra Fadnavis) सवाल विचारला आहे. फडणवीसजी तुमचं अभिनंदन कसं करावं?, एका दगडात किती पक्षी मारले? अशी विचारणा केली आहे.  तुमची आदित्य ठाकरेंशी जवळीक होती. तुम्ही त्यांना कायदा शिकवला. अजित पवारांनी त्यांच्यासोबत असणारं नातं सांगितलं. पण मग तुम्ही काँग्रेसच का बाजूला ठेवली? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी विचारला. तसेच अनुभवी सदस्यांना अध्यक्ष बनवण्याची परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले? असा प्रश्नही थोरात यांनी यावेळी विचारला. "राज्याचा कारभार इथे चालतो. गेल्या दोन वर्षात सदस्यांना संधी मिळाली नाही. सभागृहाने अनेक मोठी माणसं पाहिली."

"एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. आता देवेंद्र  फडणवीस तुमचं अभिनंदन कसं करावं असा प्रश्न पडला आहे. छगन भुजबळांनी उल्लेख केलेल्या बुद्धिबळाच्या खेळाकडे तुमचंच लक्ष नव्हतं असं वाटतं आहे" असं बाळासाहेब थोरात म्हणाले. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्याचं हित साधलं जावं ही अपेक्षा असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोबाईलवरील एक मेसेज वाचून दाखवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. या टोलेबाजीनंतर सभागृहात एकच हशा पिकला. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणNarhari Jhariwalनरहरी झिरवाळ