BJP dismisses allegations made by Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप भाजपाने फेटाळले 
उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप भाजपाने फेटाळले 

मुंबई - शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला वाद आता आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोलचला आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेला मुख्यंत्रिपदाबाबत आश्वासन दिलेच नव्हते असा दावा केला होता. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांसह अमित शहांवरही जोरदार आरोपांची फैर झाडली. त्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत  उद्धव ठाकरे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. 

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप आम्हाला अमान्य आहेत. हे आरोप आम्ही फेटाळून लावतो. आमचे सत्तेपेक्षा सत्यावर प्रेम आहे. त्यामुळे खोटारडेपणाचा प्रश्नच येत नाही,'' आम्ही मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेकडून एकही पद घेतलेले नव्हते, याचाही पुनरुच्चार मुनगंटीवार यांनी केला. 

''आमच्या पक्षामध्ये नावातच भारत आहे. भारतीय जनता आहे आणि नंतर अखेरीस पक्ष आहे.   आमचं सत्तेवर नव्हे तर सत्यावर प्रेम आहे. त्यामुळे खोटारडेपणा करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. राम मंदिराबाबत म्हणाल तर राम मंदिरासाठी आम्ही उत्तर प्रदेशमधील आमच्या सरकारचे बलिदान दिले होते, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.  


Web Title: BJP dismisses allegations made by Uddhav Thackeray
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.