शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

'मुंडे साहेबांवर भाजपने खूप अन्याय केला, आता पंकजा ताईंनाही...' एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 19:15 IST

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Eknath Khadse News : आधी भाजपचे आणि आता राष्ट्रवादीमध्ये असलेले जेष्ठ नेते आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे एकेकाळी भाजपच्या मोठ्या नेत्यांमध्ये नाव होते. पण, मध्यंतरी ते भाजपपासून दूरावले गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना तिकीट देण्यात आले नव्हते. त्यानंतर त्यांनी पक्षाला राम-राम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपवर सातत्याने टीका करतात. आता त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भाजपने ओबीसींना त्रास दिलाप्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले, 'दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपाने (BJP) खूप त्रास दिला आणि तसाच त्रास आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही दिला जातोय. भाजपने नेहमीच ओबीसींना त्रास दिलाय. आतापर्यंत अण्णासाहेब डांगे, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे यांसारख्या अनेक नेत्यांचा पक्षाने अनेकदा अपमान केला आहे. त्यानंतर माझ्यावर आणि आता पंकजा मुंडेंवरही पक्षातील काही नेत्यांकडून अन्याय झाला आहे.'

मुंडे साहेबांवर अन्यायते पुढे म्हणाले की, 'गोपीनाथ मुंडे आणि मी तीन दशकाहून अधिकाळ पक्षासाठी काम केले. त्यावेळी वाणी-ब्राह्मणांचा पक्ष म्हणून भाजपची ओळख होती. आम्ही ती ओळख पुसली आणि सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून भाजपला ओळख मिळवून दिली. पण, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी मुंडे साहेबांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट पाहावी लागली. त्यावेळी मी स्वत: त्यांच्याबरोबर हजर होतो. मधल्या काळात त्यांची इतकी छळवणूक झाली की, त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचारही आला होता,' असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. 

आता पंकजाताईंची आठवण येईल'भाजपचे काही नेते पक्षाशी एकनिष्ठ राहून पंकजा मुंडेंना अपमानास्पद वागणूक देत आहेत. पंकजा सक्षम नेत्या आहेत, त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे यांना आता ओबीसी चेहरा पाहिजे. पंकजाताई या ओबीसी आहेत आणि आता मतांची गरज आहे. त्यामुळे भाजप आता नक्कीच त्यांचा चेहरा निवडणुकांमध्ये वापरणार आहे,' असेही खडसे म्हणाले. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाGopinath Mundeगोपीनाथ मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस