शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Devendra Fadnavis : "मुख्यमंत्र्यांनी अच्छे दिन सांगावे, म्हणजे..."; देवेंद्र फडणवीसांनी 'टोमणे सभा' म्हणत उडवली खिल्ली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 08:35 IST

BJP Devendra Fadnavis And Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. टोमणे सभा म्हणत खिल्ली उडवली आहे. 

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर चौफेर हल्ला चढवला. औरंगाबादमध्ये शिवसेनेने जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत आयोजित केलेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या हिंदुत्वाचे वाभाडे काढले. तसेच एकदा महागाईविरोधात भाजपाने गणेशोत्सवादिवशीच भारत बंदची घोषणा केली होती, हेच यांचं हिंदुत्व का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. यानंतर आता या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. टोमणे सभा म्हणत खिल्ली उडवली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विटस केले आहेत. "शेतकऱ्यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?" असे सवाल विचारत निशाणा साधला आहे. "बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...! माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्‍यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"असो, संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना... काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे!" असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी टोमणेसभा हा हॅशटॅग देखील वापरला आहे. औरंगाबादच्या सभेत यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने एकदा भारत बंद नारा दिला होता.  शिवसेनासोबत होती म्हणून, नाहीतर त्यांची बंद करण्याची ताकद नाही. बंद घोषित करण्यासाठी जो दिवस निवडला, तो दिवस नेमका गणपतींच्या आगमनाचा होता. शिवसेनाप्रमुखांना मी विचारलं, तेव्हा ते आपण या बंदमध्ये सहभाही व्हायचं नाही, असं ते म्हणाले. 

मी सुषमा स्वराज यांना फोन केला. त्यांना म्हटलं बंद दिवशी गणेशोत्स्व आहे. त्यामुळे आमची अडचण होणार आहे. तर त्या म्हणाल्या, गणपती तर दहा दिवस असतो. तेव्हा मी सांगितलं गणपतींच्या आगमनापासून आनंदोत्सवास सुरुवात होते. आपण नाही म्हणालो. माफ करा आम्ही या बंदमध्ये सहभागी होऊ शकत नाही, असं सांगितलं, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

त्यावेळी तुम्ही ना हिंदूचे सण बघत नव्हतात, ना लोकांचा आनंद बघत होता. केवळ राजकारण करायचं म्हणून तुम्ही भारत बंद करत होता. भारत बंद म्हणजे बंद. गणपती आले काय गेले काय, हिंदूंचा सण आहे, काही का असेना आम्ही बंद करणार, अशी तुमची भूमिका होती. बाळासाहेबांची शिवसेना होती म्हणून तेव्हा हा बंद झाला नाही. शिवसेना नसती तर काय झालं असतं देव जाणो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद