शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

'भाजप जनतेला मूर्ख समजते', संजय राठोड यांच्या मंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 16:17 IST

शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यामुळे विरोधकांकडून टीका होत आहे.

मुंबई: नुकताच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये सर्वाच चर्चेत असणारे नाव संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणाऱ्या राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी यावरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

'भाजप जनतेला मूर्ख समजते'संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राठोड यांच्या मंत्रिपदाला विरोध दर्शवला आहे. तसेच, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरुन शरसंधान साधताना सावंत म्हणाले की, 'संजय राठोड यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश हा शिंदे गटाच्या प्रश्न असे म्हणून आशिष शेलार यांनी हात झटकणे हा भाजपाचा दांभिकपणाचा कळस आहे. मविआ सरकारमधून राजीनामा द्यावा ही मागणी भाजपा नेते एकनाथ शिंदे यांना विचारुन करत होते का? जनतेला भाजपा किती मूर्ख समजते ते दिसून येते,' असा घणाघात त्यांनी केला.

 

'शितावरून भाराची परिक्षा...'यासोबतच सावंत यांनी खातेवाटवारुनही सरकावर टीका केली. ते म्हणतात,'मंत्रीमंडळ विस्तार होऊन 24 तास उलटून गेले. ना विभाग वाटप ना कोणती दिशा. सहयोगी पक्षांची बोंब वेगळीच! शितावरून भाताची परिक्षा जनतेने करावी. भाजपाच्या सत्तेच्या वेडाचे महाराष्ट्रावर दूरगामी दुष्परिणाम होणार हे निश्चित,' अशी टीकाही त्यांनी केली.

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. 'एका तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झाले असले तरीही मी त्यांच्याविरुद्धचा माझा लढा सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे और जितेंगे,' असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडSachin sawantसचिन सावंतCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपा