शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

‘जलयुक्त शिवार योजने’वरून भाजपा, काँग्रेसमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 05:17 IST

जलयुक्त शिवार योजना राबवूनही नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. यामुळे या योजनेचे पितळ उघडे पडल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला.

मुंबई : जलयुक्त शिवार योजना राबवूनही नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. यामुळे या योजनेचे पितळ उघडे पडल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला. त्यावर भाजपाकडून तत्काळ खुलासा करण्यात आला. सावंत यांनी मे अखेरची आकडेवारी घेतली असती, तर त्यांच्याच सरकारचे पितळ उघडे पडले असते, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला. त्यावर मे २०१८ मध्ये १,६२२ टँकर लावल्याची आकडेवारी सावंत यांनी बुधवारी जाहीर केली.भाजपाच्या अकार्यक्षम, भ्रष्टाचारी कारभारावर बोट ठेवल्यामुळे भाजपाचे प्रवक्ते खोटे आकडे देत आहेत. नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारी दाखविता येत नाही, हे पाहून मे महिन्यातील आकडेवारी दाखविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सावंत यांनी केला.२०१३ मध्ये १०९ टक्के पाऊस पडून २,३२२ टँकर, तर २०१४ मध्ये ७० टक्के पावसात २,३५८ टँकर होते. टँकर लॉबी काँग्रसने पोसली होती, असा आरोप करून केशव उपाध्ये म्हणाले, युती सरकारच्या काळात मे २०१६च्या अखेरीस ९५ टक्के पाऊस पडूनही १,३४३ टँकर होते. त्यावर सावंत यांनी ३० मे २०१६ रोजी राज्यात ५,९२३ टँकर चालू असल्याची आकडेवारी सरकारच्याच संकेतस्थळावर असल्याचे दाखवून दिले. भाजपाने खरी आकडेवारी दिली असती, तर आमचे समाधान झाले असते. मात्र, भाजपाच्या खुलाशातून खोटेपणा आणि प्रवक्त्यांचे अज्ञान दिसून येते, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाJalyukt Shivarजलयुक्त शिवार