शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Chitra Wagh : "... यातच तुमचा फोलपणा कळतो"; चित्रा वाघ यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 19:34 IST

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुखांनी कानमंत्र दिलाय हिंदुत्व आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कोणी काय केलं हे बोलण्याची वेळ नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर आता भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. 

मुंबई - राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. दरम्यान, यावर ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. “शिवसेना कदापि हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुखांनी कानमंत्र दिलाय हिंदुत्व आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कोणी काय केलं हे बोलण्याची वेळ नाही,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर आता भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. 

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "हिंदुत्व आणि शिवसेना वेगळं होऊ शकत नाही... गेल्या अडीच वर्षात किती वेळा याचं सारखं सारखं स्पष्टीकरण द्यावं लागतं यातच तुमचा फोलपणा कळतो ना...उद्धव ठाकरेजी" असं वाघ यांनी म्हटलं आहे. शिवसेना आणि हिंदुत्व हे गुंफलेले, जोडलेले शब्द आहेत. ते कदापि वेगळे होऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांत काही जण अयोध्येलाही जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानभवनात बोलणारा कदाचित मी पहिला मुख्यमंत्री असेन असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

"जास्तीत जास्त काय होईल आमची सत्ता जाईल… इति सर्वज्ञानी संजय राऊत. खरं महाभारत तर त्यानंतरच सुरू होणार आहे सर्वज्ञानी संपादक महोदय. हिसाब तो देना ही पड़ेगा ना….।" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच "राज्याचा गृहराज्यमंत्री दुसऱ्या राज्यात पळून गेला तरी महाविकास आघाडी सरकारला त्याचा थांगपत्ता ही लागला नाही…. हे असे सरकार आणि हे असे मुख्यमंत्री" असंही म्हटलं आहे. 

"राज्याचा गृहराज्यमंत्री दुसऱ्या राज्यात पळून गेला तरी मविआ सरकारला थांगपत्ता लागला नाही"

चित्रा वाघ यांनी याआधी देखील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. "काल काही फुटले, आज १३ झाले. यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात…" असं वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. "जय हो...विजय हो देवेंद्र फडणवीसजी" असं देखील त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं. यासोबतच एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये "पैलवान तेल लावून आले होते पण खेळ बुद्धिबळाचा होता" असं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतला गेलेले उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील देखील माघारी परतले आहेत. आतापर्यंत शिवसेनेचे दोन आमदार परत आले आहेत. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघHindutvaहिंदुत्वUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना