शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी?"; भाजपा आमदाराचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:48 IST

BJP Chitra Wagh : भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी पुण्यातील घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. तनिषा या विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. या घटनेनंतर भाजपा आमदारांनी संताप व्यक्त केला आहे. 

"हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. असंवेदनशील, अमानवीय वागणूक मिळत असेल तर त्या रुग्णालयांना टाळे ठोका. असंवेदनशील डॉक्टरांचे लायसन्स रद्द करा" असं म्हणत टीका केली आहे. भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी पुण्यातील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"दिनानाथ मंगेशकर चॅरिटेबल हॉस्पिटलच्या गलथानपणामुळे पुण्यातील आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी दगावली. तनिषा आणि तिचे कुटुंब खरं तर आनंदात होते. तनिषा गरोदर होती आणि तिला जुळी मुलं होणार होती मात्र अचानक सातव्या महिन्यात तिला प्रसूती कळा सुरू झाल्या… म्हणून तिला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये नेलx तर आधी १० लाख भरा मगच हॉस्पिटल मध्ये एडमिशन मिळेल असा पवित्रा तिथल्या निर्ढावलेल्या डॉक्टरांनी घेतला. हे पाहून तनिषाचं मनोबल खचलं… ज्या डॉक्टरांनी धीर द्यायला हवा त्या डॉक्टरांनी थेट दुकानदारी दाखवली होती." 

"मंत्रालयातून देखील मंगेशकर हॉस्पिटलला कॉल केला तरीही मुर्दाड मनाच्या डॉक्टरांना काही फरक पडला नाही. तनिषा प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत राहिली पण मेलेल्या मनाच्या डॉक्टरांना दिसत नव्हते. खरं तर आज एका आमदाराच्या निकटवर्तीयाच्या जीवावर बेतलं सर्वसामान्य रुग्णांचे काय हाल करत असतील याचा विचार न केलेला बरा. चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल मधून  रुग्णांना असंवेदनशील आणि अमानवीय वागणूक मिळत असेल तर त्या रुग्णालयांना टाळे ठोका आणि अशा असंवेदनशील डॉक्टरांचे लायसन्स रद्द करा. एकाला कायद्याचा दणका बसला तर बाकीचे तरी सुधारतील" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य