शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोट प्रकरणः प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
3
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
5
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
6
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
7
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
8
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
9
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
10
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
11
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
12
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
13
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
14
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
15
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
16
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
17
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
18
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
19
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
20
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!

"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:30 IST

BJP Chitra Wagh And Congress Nana Patole : भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत धक्कादायक विधान केलं असून त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. "ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांच्या कम्पूटरवरील व्हिडीओ गेम होता" असं म्हटलं आहे. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. "नानांच्या नाना कळा, पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "तुमचे राहुल गांधी परदेशात जाऊन सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात आणि तुम्ही जवानांच्या शौर्याची आणि माता-भगिनींच्या दु:खाची चेष्टा करत आहात. एकंदरीत काय तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच ….देशद्रोह. काँग्रेसचा हात आणि दहशदवादाला साथ हेच आता वारंवार सिद्ध होतंय" असं म्हटलं आहे. 

"नानांच्या नाना कळा, पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा? ऑपरेशन सिंदूर हा पहलगाममध्ये ज्या ज्या माताचं सिंदूर पुसलं गेलं त्याचा हुंकार होता. आपल्या भारतीय सैनिकांनी जीव पणाला लावून, दहशतवादाविरुद्ध उभं राहून, मोठ्या शौर्याने त्यांना घरात घुसून मारलं. त्या शौर्याला तुम्ही लहान मुलांच्या कम्पूटर गेमची उपमा देत आहात. तुमच्या बुद्धीची कीव येत आहे. राजकारणासाठी आणखी किती नीच पातळी तुम्ही गाठणार आहात. नुकतंच विशेष सर्वपक्षीय मंडळ ३० देशांत जाऊन त्यांनी आपल्या देशाची भुमिका मांडली."

"पाकिस्तानचा खरा चेहरा त्यांनी जगासमोर उघड केला आणि सर्वात महत्त्वाचं दहशतवादाविरोधातील भारताची भुमिका तुमच्या काँग्रेस पक्षातील मान्यवरांनी जगासमोर मांडली. मग त्याला कम्पूटर गेम म्हणून त्याची अवहेलना करणार आहात. नाना, तुमच्यासारखी देशद्रोही माणसं भारतात असल्यामुळेच पाकिस्तानच फावतं. तुमचे राहुल गांधी परदेशात जाऊन सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात आणि तुम्ही जवानांच्या शौर्याची आणि माता-भगिनींच्या दु:खाची चेष्टा करत आहात. एकंदरीत काय तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच ….देशद्रोह. काँग्रेसचा हात आणि दहशदवादाला साथ हेच आता वारंवार सिद्ध होतंय" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेसOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPoliticsराजकारण