शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 18:08 IST

BJP Chitra Wagh News: मोठ्या ताई किती बोलणार? अडीच वर्षे सत्तेत होता त्यावेळी काय केले? कथनी आणि करणी यात फरक असतो, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

BJP Chitra Wagh News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणाचे नाव घेतले नाही मग शरद पवारांनी या गोष्टी मनाला का लावून घेतल्या? संजय राऊत हा सर्वज्ञानी आहेत. संजय राऊत नेहमी काँग्रेसचे तुणतुणे घेऊन नाचायचे काम करतात. महाराष्ट्रातील सगळ्या लोकसभा मतदारसंघात मी जात आहे याचाच भाग म्हणून बारामतीत आले आहे. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्यांकडून असे वक्तव्य करणे शॉकिंग आहे. मात्र असे असले तरी यावेळी शरद पवारांच्या सुनबाईचं दिल्लीला जाणार हे नक्की आहे, असा विश्वास भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

मीडियाशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, रोहित पवारांनी बारामतीमधील एक महिला किंवा पुरुष दाखवावा, ज्यांनी मोदींच्या एकाही योजनेचा लाभ घेतला नाही. गरीब कल्याण योजना २० लाख लाभार्थी, पीएम आवास योजना ७८ हजार, आयुष्मान भारत साडेचार लाख, जनधन योजना १०० टक्के, जल जीवन मिशन योजना २ लाख,आणि पीएम किसान योजना अडीच लाख, स्वच्छ भारत मिशन ९६ हजार एवढ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी केंद्रातील भाजपा सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेतला आहे. कोरोनाची लस आणली, त्याचे शरद पवार आणि कुटुंबीयही लाभार्थी आहेत, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. 

कोणाचा बाप आला तरी संविधानाला हात लावू शकत नाही कोणाचा बाप आला तरी संविधानाला हात लावू शकत नाही. कुठेतरी आमच्या  विरोधात चुकीच्या गोष्टी पसरवण्याचे काम विरोधक करीत आहेत.  काँग्रेसच्या काळात संविधानात ९० बदल करण्यात आले आहे. ज्यांनी संविधान दिले, त्यांना निवडणुकीत दोनदा पाडण्याचे पाप या काँग्रेसने केले, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

दरम्यान, मोठ्या ताई किती बोलणार? अडीच वर्षे सत्तेत होता त्यावेळी काय केले? कथनी आणि करणी यात फरक असतो, ज्यावेळी सत्तेत असतात त्यावेळी सगळे विसरून जातात विरोधक आल्यावर त्यांना सगळं आठवते. त्या काय बोलतात याला महत्त्व नाही, त्यांची परिस्थिती बघून मला खूप हसायला येते. वाहनात बसून एखाद्याचे रील काढून घ्यायचे, लगेच व्हायरल करायचे हेच त्यांचे काम आहे. तोंडाने म्हणायचं रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटणकरी.  सुप्रिया सुळे यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे, या शब्दांत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला. 

टॅग्स :baramati-pcबारामतीChitra Waghचित्रा वाघMahayutiमहायुतीBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४