शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Chandrashekhar Bawankule : "उद्धवजी, तुम्हीच कलंकित, हिंदुत्व गुंडाळून ठेवलं; तुमच्याबद्दल शिल्लक असलेला आदरसुद्धा संपला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 11:42 IST

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक आहे, असं म्हटलं आहे. यावरून आता राजकारण तापलं. भाजपाने या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. "उद्धवजी, तुम्हीच कलंकित आहात. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला. हिंदुत्व गुंडाळून ठेवले. तुम्ही अहंकारी आहात. तुमच्याबद्दल शिल्लक असलेला आदरसुद्धा आता संपला आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे" असंही म्हटलं आहे. 

भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उद्धवजी, तुमच्याबद्दल शिल्लक असलेला आदरसुद्धा आता संपला आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे कलंक नाहीत तर महाराष्ट्र भूषण आहेत. उद्धवजी तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आपण काय बोलत आहोत, याचे भान तुम्हाला राहत नाही. भाजपा नेत्यांना उद्देशून तुम्ही ‘ मर्दाची औलाद असाल तर‘ असे विधान केले. अशी भाषा एखाद्या गावगुंडाची असते."

"उद्धवजी, आमचे नेते देवेंद्र जी मुख्यमंत्री असताना त्यांनी तुम्हाला अनेकदा सांभाळून घेतले. तुमचे आणि तुमच्या लहान मुलाचे अक्षरशः लाड केले. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. त्यांचे मन पवित्र आहे. त्यांच्यावर तुम्ही कितीही टीका केली तरीही ते विचलित होणार नाहीत. मदत करण्याचा त्यांचा स्वभाव कायम आहे आणि राहील देखील."

"उद्धवजी, तुम्हीच कलंकित आहात. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला. हिंदुत्व गुंडाळून ठेवले. तुम्ही अहंकारी आहात. छोट्या मनाचे आहात. तुमची कीव येते. राजकीय मतभेद असतात पण अशी भाषा कुठलाही राजकीय विरोधक करीत नसतो. देवेंद्रजी सारख्या देव माणसावर अशी विकृत टीका करून तुम्ही तुमच्याबद्दल असलेला थोडाबहुत आदर सुद्धा आता संपवून टाकला आहे. तुमची घृणा वाटू लागली आहे" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते मा. देवेंद्र फडणवीस यांचे काय कर्तृत्व आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवलं आहे."  

"उद्धव ठाकरे तुम्ही २०१९ साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं तुम्ही वाहिलं हेही महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं सामान्य शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं. घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही १०० कोटीची वसुली केली आणि महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस