शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसने राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 11:29 IST

BJP Chandrashekhar Bawankule Slams Congress : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम मंदिरावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे सर्वपक्षीयांना निमंत्रण देण्यात आले. मात्र या अभिषेक सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. यावरून पक्षात गोंधळ उडाला असून निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसचे कार्याध्यक्ष अंबरिश डेर, आमदार अर्जुन मोधवाडिया, यूपी काँग्रेसचे आचार्य प्रमोद कृष्णा यांसारख्या नेत्यांनी पक्षाच्या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. 

प्रभू राम हे देशातील जनतेच्या श्रद्धेचा विषय असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. याच दरम्यान भाजपाने यावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्याविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "काँग्रेसने राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं" असा टोला देखील लगावला आहे. 

भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम मंदिरावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटरून याबाबत ट्विट केलं आहे. "जो न हित के राम का वह न किसी के काम का! काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्याविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं होतं. रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते. मंदिराचा ७/१२ मागत होते."

"राम मंदिराच्या निर्मितीबाबत अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करत होते.. रामभक्तांची खिल्ली उडवत होते. आता पुन्हा एकदा करोडो भारतीयांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिर उभारणी होत असताना काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलं आहे. यापूर्वी काँग्रेसनं अनेकवेळा हिंदूविरोधी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आली आहे. काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं. जय श्रीराम!" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेcongressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा