दुर्दैवाना उद्धव ठाकरेंना हे लक्षात येत नाही; शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याबाबत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 08:31 PM2021-09-05T20:31:18+5:302021-09-05T20:35:52+5:30

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि राज्यातील महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

BJP Chandrakant Patil Target Shivsena Sanjay Raut and Sharad Pawar | दुर्दैवाना उद्धव ठाकरेंना हे लक्षात येत नाही; शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याबाबत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

दुर्दैवाना उद्धव ठाकरेंना हे लक्षात येत नाही; शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याबाबत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

googlenewsNext
ठळक मुद्देसांगली-कोल्हापूरमध्ये येऊन गेलेल्या पूरानंतर पंचनामे होऊनही जर पूरग्रस्तांना मदत मिळत नसेल, तर का आक्रमक होऊ नये? आम्हीदेखील तुमच्या स्क्रीप्टनुसार काम करायचं का? सरकारने त्यांचे काम करावेराष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होत आहे. कॉंग्रेस लयास गेली आहे. तर शिवसेना दिवसेंदिवस कमकुवत बनत चालली आहे

पुणे - संजय राऊत २०१४ पासून सातत्याने भाजपासोबत सरकार होऊ नये यासाठी काम करत आहेत. २०१४ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांची एकूण संख्या १४४ पर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे संजय राऊत यांना त्यावेळी काही करता आले नाही. मात्र २०१९ मध्ये तिघांची एकूण संख्या १४४ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्रित येऊन सरकार बनविण्यासाठी काम केलं. दुर्दैवाने उद्धवजींना हे लक्षात येत नाही, संजय राऊत हे शिवसेनेसाठी नाही, तर शरद पवार यांच्यासाठी काम करत आहेत. यातून एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होत आहे. कॉंग्रेस लयास गेली आहे. तर शिवसेना(Shivsena) दिवसेंदिवस कमकुवत बनत चालली आहे असा गौप्यस्फोट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोथरुड मधील मुलींना ड्रेस वाटपाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) म्हणाले की, शिवसेना सध्या कोणीतरी दिलेल्या स्क्रीप्टनुसार काम करते. त्यामुळे आम्हीदेखील तुमच्या स्क्रीप्टनुसार काम करायचं का? सरकारने त्यांचे काम करावे, आम्ही आमचं काम करत राहू. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत. पण त्यांच्या जर-तरच्या वाक्यावरुन अटक होते. त्यापेक्षा संजय राऊत यांचे कोथळा काढू हे वाक्य भयंकर आहे. त्यावर मी फक्त एवढंच म्हटलं की, कोथळा काढायसाठी हातात जे शस्त्र घ्यावं लागतं, ते घेण्यासाठी तुमच्या दंडात तेवढी ताकद आहे का बघा? त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करत राहू, ते कुणीतरी दिलेल्या स्क्रिप्ट नुसार काम करतात. आम्ही देखील तसंच काम करायचं का? असा थेट सवाल त्यांनी शिवसेनेला विचारला आहे.

'जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल'; सुधीर मुनगंटीवारांची संजय राऊतांवर टीका

तसेच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) सरकारच्या काळात पंचनामे पूर्ण झालेले नसताना ही तातडीने मदत देऊ केली. आता नुकत्याच सांगली-कोल्हापूरमध्ये येऊन गेलेल्या पूरानंतर पंचनामे होऊनही जर पूरग्रस्तांना मदत मिळत नसेल, तर का आक्रमक होऊ नये? असा सवाल चंद्रकांत पाटील उपस्थित करत भाजपानं राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला. कोविडमध्ये नुकसान झालेल्यांना राज्य सरकारने जे पॅकेज जाहीर केले, त्याचा एक रुपया ही मदत मिळालेली नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

शरद पवारांवर धडा लिहायला लागेल

संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या शरद पवार यांनी कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसले नसल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना चंद्रकांत पाटील यांनी चिमटा काढला. शरद पवारांनी पाठित खंजीर खुपसल्यावर शालेय पाठ्यपुस्तकात धडाच येण्याचं बाकी आहे. कारण वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर कोणी खुपसले, हे संपूर्ण राज्याला माहिती आहे असा टोला चंद्रकांतदादांनी संजय राऊत आणि शरद पवारांना लगावला.

OBC आरक्षण मिळावे हे सरकारच्या मनात नाही

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे हे सरकारच्या मनातच नाही आहे. त्यामुळे ते वेगवेगळी करणे सांगून पुढे ढकलत आहेत. आता ओबीसी आरक्षण आणि कोविडचं कारण सांगून महापालिका निवडणूक पुढे ढकलत आहेत. त्याद्वारे प्रशासक नेमून महापालिका ताब्यात घेण्याचा सरकारचा डाव आहे. जर इच्छाशक्ती असेल, तर एक महिन्याच्या आत देखील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येईल असा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

Web Title: BJP Chandrakant Patil Target Shivsena Sanjay Raut and Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.