शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून भाजपानं युती तोडली, एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावरून संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 12:44 IST

परंतु निकाल लागल्यानंतर भाजपाने शब्द फिरवला असा आरोप संजय राऊतांनी केला.

मुंबई – एकनाथ शिंदे यांनाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करणार होते. परंतु भाजपाने मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण हे विचारले तेव्हा आम्ही एकनाथ शिंदे असं नाव सांगितले. त्यानंतर ही युती तोडली असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्रिपदावरून राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, आता भाजपा भंपक बोलतायेत. महाराष्ट्राच्या जनतेला खोटं सांगून दिशाभूल करू नका. शिवसेना फोडून त्याच एकनाथ शिंदेंना तुम्ही मुख्यमंत्री करता. त्यामुळे तुम्ही कटकारस्थान करून हे सगळे केले. शिवसेनेबद्दल कपट भावना भाजपाच्या मनात होती. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, एनडीएच्या बैठकीत त्यांनी युतीबाबत केलेले विधान असत्य आहे. २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली ती एका जागेवरून..ही युती तोडण्याची जबाबदारी पक्षाने एकनाथ खडसेंवर सोपवली. खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्या सूचनेवरून भाजपाने शिवसेनेसोबत युती तोडली. मोदी लाट होती त्यामुळे स्वबळावर भाजपाची सत्ता हवी होती म्हणून २५ वर्षाची युती तोडली. २०१९ मध्येही भाजपाने शिवसेनेसोबत युती तोडली. जागावाटप, सत्तावाटप एकमत झाले.  पॉवर शेअरिंग ५०-५० टक्के होते. परंतु निकाल लागल्यानंतर भाजपाने शब्द फिरवला असा आरोप संजय राऊतांनी केला.

दरम्यान, केंद्रीय गृहविभागाकडून यंदा राज्याच्या पोलीस दलासाठी एकही पदक दिले नाही यावर बोलताना या राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री, सक्षम गृहमंत्री आणि २ कर्तबगार उपमुख्यमंत्री लाभलेत त्यांनी बोलायला हवं. प्रत्येकवेळी महाराष्ट्राचा अपमान दिल्लीकडून होतोय त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवे. उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कारभार करायला मुख्यमंत्री झालोय की आराम करायला झालोय हे स्पष्ट करावे. मुख्यमंत्री आरामाला गेलेत असं वाचले. महाराष्ट्राच्या अस्मितेवर स्वाभिमानावरील विषयावर बोलायला हवे. आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला परवडणार नाही. महाराष्ट्राला डावललं जाते. प्रत्येकवेळी महाराष्ट्राचा अपमान होतोय हे धोरण सरकारने स्वीकारले आहे. तुमच्या मानेत गुलामगिरी पट्टा बांधलाय त्यावर बोला असं आव्हानही राऊतांनी भाजपाला दिले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे