शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

महापालिका सत्तेपासून भाजपा दूर? पुण्यात टेन्शन वाढलं; महाविकास आघाडीचा करिष्मा चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 10:43 IST

पुणे महापालिकेत फडणवीस सरकारच्या काळात भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती.

ठळक मुद्देसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच हे सर्वेक्षण करण्यात आले होतं. मोजक्याच नेत्यांना याची कल्पना होतीआगामी महापालिका निवडणूक भाजपाला जड जाण्याची शक्यता आहेपुणे महापालिकेत एकूण १६४ जागा असून त्यातील ९० हून अधिक जागा जिंकत भाजपाने बहुमत सिद्ध केले होते.

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यंदाची महापालिका निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी(BJP) आव्हानात्मक असणार आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी(Shivsena-Congress-NCP) या तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी बनवली आहे. राज्यात या महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांचा आहे. परंतु याबाबत अधिकृत घोषणा नाही

पण त्यात भाजपासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. पुणे महापालिकेत फडणवीस सरकारच्या काळात भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपा नगरसेवकांची संख्या ९० च्या पुढे पोहचली होती. मात्र आगामी महापालिका निवडणूक भाजपाला जड जाण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणातून भाजपाला पालिका निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठता येणार नाही असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा सर्व्हे इतर कुणी नसून तर भाजपानेच केला आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच हे सर्वेक्षण करण्यात आले होतं. मोजक्याच नेत्यांना याची कल्पना होती. महापालिका निवडणुकीत भाजपाला जास्तीत जास्त ७५ ते ८० जागांवरच विजय मिळण्याची शक्यता रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. २०१४ पासून भाजपानं राज्यात ठिकठिकाणी पाय रोवण्यास सुरूवात केली होती. पुणे महापालिकेतही मागील निवडणुकीत घवघवीत यश भाजपानं संपादन केले होते.(Pune Municipal Corporation Survey)  

पुणे महापालिकेत एकूण १६४ जागा असून त्यातील ९० हून अधिक जागा जिंकत भाजपाने बहुमत सिद्ध केले होते. महापालिकेत बहुमतासाठी ८४ नगरसेवकांची गरज आहे. परंतु एकट्या भाजपाने त्यापेक्षा अधिक जागा जिंकल्याने सत्तेसाठी कुठल्याही पक्षाची मदत घेण्याची गरज भासली नाही. मात्र आता आलेल्या सर्वेक्षणातून भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं दिसून येते. 

महापालिका निवडणुकीत आघाडी होणार का? येत्या वर्षभरात १० महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे महापालिका सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. पुणे महापालिका निवडणूक पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार तयारी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवडवर विशेष लक्ष दिले आहे. तर शिवसेनेने महाविकास आघाडी झाल्यास ८० जागा हव्यात अशी मागणी केली आहे. शिवसेना नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाली तर निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

पुणे महापालिका पक्षीय बलाबलभाजपा - ९९काँग्रेस - ९राष्ट्रवादी - ४४शिवसेना - ९ मनसे - २एमआयएम - १एकूण - १६४ 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस