भाजपकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न; अखिलेश यादवांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 14:28 IST2020-02-17T14:28:12+5:302020-02-17T14:28:46+5:30
दोन दिवसांपूर्वीच आपल्याला जिवे मारण्याची धमकी फोनवरून मिळाली होती

भाजपकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न; अखिलेश यादवांचा गंभीर आरोप
उत्तरप्रदेश : भाजप नेत्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव यांनी केला आहे. रविवारी त्यांनी पत्रकार परिषेद घेत हे आरोप केला आहे. तर माझी सभा सुद्धा उधळण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपकडून करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
शनिवारी कन्नौज येथे सपाच्या महिला परिषदेदरम्यान एका युवकाने अखिलेश यादव यांच्या सभेत प्रवेश केला आणि जयश्री राम अशी घोषणाबाजी केली. या वेळी सपाच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. यावरून अखिलेश यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली.
तर दोन दिवसांपूर्वीच आपल्याला जिवे मारण्याची धमकी फोनवरून मिळाली होती, त्यामुळे कदाचित भाजपाच्या काही नेत्याने सपाच्या कार्यक्रमात दाखल झालेल्या तरुणांना पाठवले असेल, असेही ते यावेळी म्हणाले.