शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"भारत जोडो न्याय सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना घेऊन सावरकर स्मारकात जावं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 13:55 IST

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत पोहोचली आहे. आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, एम.के. स्टॅलिन आणि अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत. य़ाच दरम्यान भाजपाने निशाणा साधला आहे. 

भाजपानेउद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "शिवतीर्थावर "भारत जोडो न्याय सभेला" जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी श्रीमान राहुल गांधी यांना घेऊन सावरकर स्मारकात जावे..." असं म्हटलं आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "श्रीमान उद्धव ठाकरे यांना आज हिंदुत्वाशी "न्याय" करण्याची एक उत्तम संधी आलीय..."

"शिवतीर्थावर "भारत जोडो न्याय सभेला" जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी श्रीमान राहुल गांधी यांना घेऊन सावरकर स्मारकात जावे... स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करावे... स्मारकात ठेवण्यात आलेला "कोलू" ओढून राहुल गांधी यांना प्रायश्चित्त करण्याची एक संधी उपलब्ध करून द्यावी.. तुमचं हिंदुत्व, महाराष्ट्र प्रेम, मराठीपण सिद्ध करण्यासाठी आलेली संधी तुम्ही घालवलीत... तर आज महाराष्ट्र तुमच्या "भगव्या" शालीचा रंग बदला यावर शिक्कामोर्तब करेल!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"अरेच्चा उद्धवजी! हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान?"

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अरेच्चा उद्धवजी…!  हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान? तुमचं खोटं प्रेम आणि बेगडी अभिमान काँग्रेसचरणी लोटांगण घालताना साऱ्या मराठी जनतेने आज पाहिला…"

"राहुल गांधी सगळ्या ऐतिहासिक स्थळांना आणि महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत मुंबईभर फिरताहेत. पण, दोन स्थळांबद्दल मात्र त्यांना भलतीच ॲलर्जी... स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृती जागवणारं शिवतीर्थ..! काँग्रेस वारंवार या महामानवांना अपमानित करूनही उबाठा गटाला लाचारी काही सोडवत नाही. काँग्रेसची मुजोरी आणि उबाठाची ‘जी हुजुरी’ हेच राहुल गांधींच्या पदयात्रेत पाहायला मिळतंय…" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी