शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

उदयनराजें विरोधात भाजपाकडून उमेदवार ठरला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 12:40 IST

साताऱ्यामध्ये माथाडी कामगारांची संख्या जास्त आहे. यामुळे पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्याचा इतर मतदारसंघांमध्येही फायदा होऊ शकतो.

सातारा : साताऱ्यात गेल्या काही निवडणुकांत उदयनराजे एकहाती निवडऊन येत आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचे नाव भाजपकडून पुढे करण्यात आले आहे. 

साताऱ्यामध्ये माथाडी कामगारांची संख्या जास्त आहे. यामुळे पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्याचा इतर मतदारसंघांमध्येही फायदा होऊ शकतो. याचा विचार करून खासदार उदयन राजे यांच्याविरोधात पाटील यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजपामध्ये सुरु आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नावाची भाजपकडून चाचपणी सुरु आहे. उदयन राजे राष्ट्रवादीचे खासदार असले तरीही शरद पवार वगळता एकाही नेत्याशी त्यांचे जुळत नाही. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते नाराज होते. यामुळे भाजपाने त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्नही केला होता. उदयनराजेंनी उघडपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही स्तुती केली होती. तसेच मुंबईमध्ये भेटही घेतली होती. या पाश्वभुमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची वेळोवेळी भेट घेत मनधरणीही केली होती. 

अखेर गेल्या काही दिवसांपूर्वीच उदयनराजेंची साताऱ्यात शरद पवार यांनी भेट घेत खासदारकीची जागा पक्की केली होती. यानंतर उदयन राजेंनी पक्षाच्या प्रचारासाठी अन्य मतदासंघांमध्येही यावे अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली होती. साताऱ्यातून उदयनराजेंना विरोध असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार का नाही, याबाबत चर्चा होती. मात्र, पवार-भोसले भेटीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

आता लग्नात अक्षता टाकाच्या वक्तव्याने कल्ला...उदयनराजे भोसले यांनी महिन्याभरापूर्वी साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं भरभरून कौतुक करतानाच, अप्रत्यक्षपणे त्यांना मतं देण्याचं आवाहन केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 'तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे निर्णय घेतले, ते यापूर्वी कुणीही घेतले नव्हते. घोषणा भरपूर झाल्या, पण अंमलबजावणी झाली नव्हती', असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र सरकारची पाठ थोपटली. साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसही स्टेजवर होते. 

एका महिन्याभरात माझं लग्न आहे आणि तीन-चार महिन्यांनंतर या सगळ्यांचं लग्न आहे. अक्षता टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला. इतक्यात टाकू नका. नाहीतर त्यावेळी म्हणाल, तुम्ही सांगितल्या म्हणून अक्षता टाकल्या आता शिल्लकच राहिल्या नाहीत, असं मजेशीर; पण तितकंच सूचक वक्तव्य उदयनराजे यांनी केलं.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार