शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा व उद्धव हे दोनच सरकारचे लाभार्थी , विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 20:01 IST

गेल्या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम केले. सरकारने केलेली कामे दिसलीच नाहीत, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून ‘मी लाभार्थी, हे माझे सरकार’ अशा फसव्या जाहिराती करण्यात आल्या.

नागपूर : गेल्या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम केले. सरकारने केलेली कामे दिसलीच नाहीत, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून ‘मी लाभार्थी, हे माझे सरकार’ अशा फसव्या जाहिराती करण्यात आल्या. या सरकारचा सामान्याला लाभच झाला नाही. भाजपा व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोन या सरकारचे खरे लाभार्थी आहेत, अशी बोचरी टीका विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी केली. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर विरोधी पक्षाची बैठक झाली. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींनी सरकार सर्वच प्रश्नांवर अपयशी ठरल्याचा आरोप करीत सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली. तीन वर्षात सरकार कोणकोणत्या मुद्यांवर अपयशी ठरले याचा एक फलकच विरोधकांनी तयार करून लावला आहे.  या फलकाकडे इशारा करीत विखे पाटील म्हणाले, सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. आता जनता ‘क्या हुवा तेरा वादा..’ असे मुख्यमंत्र्यांना विचारू लागली आहे. जनतेसोबतच आता भाजपाच्या खासदार, आमदारांमध्ये खदखद सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. ओखी वादळ हे नैसर्गिक संकट होते, तर भाजपाचे सरकार सुलतानी संकट आहे. हे दोन्ही संकट गुजरातमार्गे महाराष्ट्रात दाखल झाले, अशी टीकाही त्यांनी केली. 

धनंजय मुंडे म्हणाले, सरकारच्या विविध मंत्र्यांचे विविध घोटाळे आम्ही बाहेर काढले. त्याचे सरकारला पुरावेही दिले. मात्र, सरकारची पारदर्शकता अशी झाली की, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागितलेली फाईल द्यायची की नाही यावर निर्णय घेण्यासाठी तीन सचिवांची समिती नेमली. गुजरातमध्ये जसा ‘विकास’ पागल झाला आहे. तशी महाराष्ट्रात ‘पारदर्शकता’ पागल झाली आहे, अशी बोचरी टीका मुंडे यांनी केली. बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे ३० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी २५ हजार रुपयांची मदत देण्याची मागणी मुंडे यांनी केली.  

कर्जमाफीच्या याद्या सभागृहात सादर करा

-कर्जमाफीचा घोळ आॅनलाईनमुळे झाला. सरकारने माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या सचिवांची बदली केली. मात्र, आॅनलाईचे काम करणारी इनोव्हेव कंपनी याची लाभार्थी आहे. तिच्यावर कारवाई झालेली नाही. कर्जमाफीसाठी अर्ज करणाºया शेतकºयांची यादीचे चावडीवर वाचन करून शेतकºयांची इज्जत काढल्या गेली. पण किती शेतकºयांना नेमकी किती कर्जमाफी देण्यात आली याची अद्याप आकडेवारी दिली गेली नाही. सरकारने विधिमंडळ सभागृहात कर्जमाफीच्या याद्या सादर कराव्या, अशी मागणी विखे पाटील व मुंडे यांनी केली. तर, कर्जमाफीची रक्कम जमा करण्यावरून मुख्यमंत्री व सहकारमंत्री वेगवेगळ्या तारखा देत असल्याचे सांगत कर्जमाफीच्या मतदारसंघनिहाय याद्या जाहीर करण्याची मागणी अजित पवार यांनी केली.

यादव सापडत नसेल तर मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासा-

- भाजपचे नेते मुन्ना यादव हे फरार आहेत. त्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश येत आहेत. यादव सापडत नसेल तर मुख्यमंत्र्यांचे मोबाईल तपासा, म्हणजे यादवांचे लोकेशन कळेल, असा चिमटा मुंडे यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना काढला. तर यशवंत सिन्हा तुरुंगात व यादव बाहेर, असा सरकारचा कारभार सुरू असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

उद्धव ठाकरेंची इशा-यांच्या शतकाकडे वाटचाल-

- उद्धव ठाकरे यांनी आजवर ९३ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले आहेत. त्यांची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन करीत विखे पाटील यांनी चिमटा काढला. एकीकडे उद्धव ठाकरे हे देश खड्ड्यात चालला आहे, असे म्हणतात. तर दुसरीकडे खड्डे खोदण्यासाठी मदत करतात. गरज कुणाची आहे, ते स्वत:च्या गरजेसाठी असे बोलतात, असा टोलाही त्यांनी लगावला. 

सरकार दिळखोरीकडे : अजित पवार

- राज्य सरकारची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू आहे. सरकारकडे विकास कामांसाठी पैसा नाही. जिल्हा नियोजन समितीच्या निधीला ३० टक्क्यांपर्यंत कट लावण्यात येत आहे. कर्जमाफीसाठी रक्कम वळविण्यात आली, असे कारण समोर केले जात आहे. प्रशासनातील महत्वाचे पदे रद्द करून बचत करू पाहत आहेत. यामुळे प्रशसाकीय कामाची गती मंदावली आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर