शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाजपा आणि रिपाइंची तुटली युती

By admin | Updated: February 6, 2017 18:54 IST

भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) यांची राज्यात युती आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 6 - भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) यांची राज्यात युती आहे. महापालिकेच्या निवडणुकीतही ही युती कायम होती. परंतु नागपुरात रिपाइं (आ) ला भाजपने एकही जागा सोडली नसल्याने ही युती तोडण्याचा निर्णय रिपाइं (आ) च्या नागपुरातील पार्लमेंट्री बोर्डाच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.

जागा वाटपावरून सध्या सर्वच पक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यातच मित्र पक्षांना समाधानकारक जागा न सुटल्याने तेसुद्धा प्रचंड नाराज आहेत. यात भाजपाचे मित्र पक्ष सर्वाधिक नाराज आहे. नागपुरात भाजपाची रिपाइं (आठवले) आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंच यांच्याशी युती आहे. रिपाइं आठवले यांची राज्यस्तरावर भाजपासोबत युती आहे. नागपुरात १५ जागांचा प्रस्ताव रिपाइंतर्फे भाजपाला देण्यात आला होता. परंतु ऐन वेळेवर रिपाइंला केवळ एक जागा सोडण्यात आल्याचे भाजपातर्फे जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत सांगण्यात आले आहे. सोडण्यात आलेल्या जागेवर ज्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे, ते उमेदवारही रिपाइं (आ)चे नसून भाजपाचेच आहेत. त्यामुळे रिपाइंला भाजपाने एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे रिपाइं (आ) च्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सन्मानजनक जागा सोडल्या तरच भाजपसोबत युती करू असे, असे रिपाइं (आ)च्या स्थानिक नेतृत्वातर्फे अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी सीताबर्डी येथील रिपाइं (आ)च्या शहर कार्यालयात नागपुरातील निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पार्लमेंट्री बोर्डाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आर. एस. वानखेडे, प्रा. पवन गजभिये, राजन वाघमारे, हरीष जनोरकर, विनोद थुल, कांतीलाल पखिड्डे, भीमराव मेश्राम, सतीश तांबे आणि राजेश ढेंगरे उपस्थित होते. या बैठकीत भाजपाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. एकही जागा सुटली नसल्याने भाजपासोबत राहण्यात काही अर्थ नाही, असे यावेळी सर्वांनीच मते बनवली. त्यामुळे नागपुरात भाजपसोबत युती तोडण्याचा बोर्डाने निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल पक्ष श्रेष्ठींनाही कळविण्यात आले आहे. रिपाइं (आ)तर्फे ७ उमेदवारांनी उमेदवारीच अर्ज दाखल केले आहे. त्या उमेदवारांचा पूर्ण ताकदीने प्रचार करणे आणि भाजपाविरोधात प्रचार करण्याचा निर्णयसुद्धा या बैठकीत घेण्यात आला आहे.- भाजपाच्या चिन्हावर लढणाऱ्यास पक्षातून निलंबितरिपाइंचे उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर लढणार नाही, अशी भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली होती. त्यानुसार राज्यभरात जे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवित आहेत. त्यांनाही पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे पार्लमेंट्री बोर्डने यावेळी जाहीर केले.- भाजपाने विश्वासघात केलाभाजपाने आमचा विश्वासघात केला आहे. त्यांनी युतीचा धर्म पाळलेला नाही. आम्हाला (रिपाइं आ) ला दोन जागा सोडण्यात आल्याचे भाजप वर्तमानपत्रात जाहीर करते. परंतु ते चुकीचे आहे. आम्हाला एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे आता नागपुरात युती राहिलेली नाही. आम्ही आमचे उमेदवार लढवणार आणि भाजपाविरोधात प्रचार करणार.राजन वाघमारेशहराध्यक्ष, रिपाइं (आ.)