शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:56 IST

ठाणे, पुणे अथवा सिंधुदुर्ग असेल याठिकाणी महायुतीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

मुंबई - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेनेत वादाचे खटके उडू लागल्याचं चित्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपा नेते मंत्री गणेश नाईक सातत्याने आक्रमक विधाने करत आहेत. त्यावरून ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेतील कटुता वाढली आहे. हे वाद संपत नाही तोवर पुणे, सिंधुदुर्ग येथेही शिंदेसेनेचे नेते उघडपणे भाजपा मंत्र्यांविरोधात वक्तव्ये करत आहेत. 

पुण्यात गुंड निलेश घायावळ प्रकरणी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रवींद्र धंगेकर म्हणाले की, निलेश घायावळ आज गुंडगिरी करत नाही. गेली अनेक वर्ष तो कोथरूड भागात दहशत निर्माण करण्याचं काम करतोय. त्याला पासपोर्ट मिळत असेल, त्याला शासकीय सुविधा घरपोच मिळत असेल तर त्याच्यामागे कुणाचा हात आहे ही वस्तूस्थिती लपून राहिली नाही. निलेश घायावळ याला ज्या पोलिसाने पासपोर्ट दिला त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यात कुणी हस्तक्षेप केला, कुणी दबाव आणला हे शोधले पाहिजे. चंद्रकांत पाटील कोल्हापूरहून पुण्यात आल्यापासून त्यांच्या डोळ्यासमोर हे आहे. त्यांच्या ऑफिसमधून गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असेल ही गुन्हेगारी संपणार नाही. यात पूर्णपणे पाप चंद्रकांत पाटील यांचे आहे असं त्यांनी आरोप केला. 

दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्याप्रकरणी नुकतेच एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश केलेले राजन तेली यांनी गंभीर आरोप केले. जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्यामागचे सूत्रधार पालकमंत्री नितेश राणे आहेत. कोकणात सहकार क्षेत्र टिकवण्यासाठी शासनाने लक्ष घातले पाहिजे. जे भूमाफिया आहेत ते पालकमंत्री नितेश राणेंचे बॅनर लावतात. मी गेली ७-८ महिने बँकेचे गैरव्यवहार आणि कर्ज घोटाळ्यावर बोलतोय. रॉक्सस्टार ही कंपनी हिला कर्ज देण्यात आले. हे बाहुले नितेश राणे यांचे आहे. पालकमंत्री नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली बँक चाललीय, या सर्व घोटाळ्यामागे ते आहेत. २० हजार मानधनावर असलेल्या पीएला साडे सात कोटी कर्ज दिले गेले असा आरोप राजन तेली यांनी नितेश राणेंवर केला आहे. 

दरम्यान, ठाणे, पुणे अथवा सिंधुदुर्ग असेल याठिकाणी महायुतीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. भ्रष्टाचार, गुन्हेगारीला खतपाणी घालण्यासारखे गंभीर आरोपच शिंदेसेनेचे नेते भाजपा मंत्र्‍यांवर करत असले तर सर्वसामान्यांनी कुणाकडे दाद मागायची हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. राज्यातील सत्ता एकत्रित उपभोगायची आणि स्थानिक पातळीवर एकमेकांचे वाभाडे काढायचे असं धोरण शिंदेसेना-भाजपा नेत्यांनी अवलंबलंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cracks in Maharashtra's ruling alliance surface before local elections.

Web Summary : Tensions rise between Shinde Sena and BJP leaders in Maharashtra before local elections. Accusations of corruption and supporting criminals are exchanged in Thane, Pune, and Sindhudurg, raising questions about the alliance's stability and governance.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNitesh Raneनीतेश राणे chandrakant patilचंद्रकांत पाटील