शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

एमआयएम, भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू : नसीम खान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 7:27 AM

निवडणूक आल्यावर एमआयएमला मुस्लीम आरक्षण आठवते, निवडणूक संपली की यांना आरक्षण आठवत नाही, नसीम खान यांचा आरोप.

मुंबई : एमआयएम आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात पाच टक्के आरक्षण दिले. न्यायालयाने ते मान्य केले तरी नंतरच्या काळातील फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. एकीकडे काँग्रेस आरक्षणासाठी संघर्ष करत असताना एमआयएमचे आमदार मात्र विधानसभेत अवाक्षरही काढत नव्हते, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी रविवारी केला.काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला दिलेले पाच टक्के आरक्षण न्यायालयाने मान्य केले होते. पण, नंतर सत्तेत आलेल्या भाजपने त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यावेळी काँग्रेस पक्ष संघर्ष करत होता. मात्र, एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते, परंतु पाच वर्षे हे आमदार मुस्लीम आरक्षणावर गप्प का बसले होते. त्यांनी फडणवीस सरकारला कधीही जाब का विचारला नाही, असा प्रश्न नसीम खान यांनी उपस्थित केला आहे. मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमने मुंबईत सभा घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर खान यांनी एमआयएमला प्रश्न केला.निवडणूक आल्यावर एमआयएमला मुस्लीम आरक्षण आठवते, निवडणूक संपली की यांना आरक्षण आठवत नाही. भाजप आणि एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून सत्तेचे राजकारण करणाऱ्या भाजपला एमआयएम साथ देत असते. एमआयएमची भूमिका ही नेहमीच भाजपला अनुकूल राहिली आहे, असेही नसीम खान म्हणाले.मुंबई महापालिकांसह राज्यभरातील नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर ओवेसींना मुस्लिमांचा विकास आणि आरक्षण आठवले. आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी त्यांच्या पक्षाने मुस्लीम समाजासाठी काय केले, याचा हिशेब द्यावा, असे नसीम खान म्हणाले.

टॅग्स :Naseem Khanनसीम खानBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन