शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकले राजकारणात 'रिटर्न'! पुणे पदवीधर संघाच्या निवडणुकीत 'एंट्री'  

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: November 09, 2020 1:30 PM

राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा, विधानसभा अशी कोणतीही निवडणूक म्हटलं की साताऱ्याचे अभिजित बिचुकले हे एक व्यक्तिमत्व झटकन डोळ्यांसमोर येतं...

ठळक मुद्देभाजपाकडून पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची यादी जाहीर.. 

पुणे : राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा, विधानसभा अशी कोणतीही निवडणूक म्हटलं की साताऱ्याचे अभिजित बिचुकले हे एक व्यक्तिमत्व झटकन डोळ्यांसमोर येतं..त्यांनी साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे यांच्याविरुद्ध लोकसभा आणि वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवण्याची धमक दाखवली आहे. आजपर्यंत बिचुकले यांनी विविध निवडणुका जरी लढवलेल्या असल्या तरी अद्याप एकही निवडणूक त्यांना जिंकता आलेली नाही. परंतु, प्रत्येक निवडणुकीत ते आपल्या 'हटके' प्रचार स्टाईलने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. पण ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले ते मराठी 'बिग बॉस'या कार्यक्रमाने. आता हेच अभिजित बिचुकले पुन्हा एका निवडणुकीचे मैदान गाजवण्यासाठी रिंगणात उतरले आहे. 

राज्यात या घडीला पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. मनसेने पुणे पदवीधर निवडणुकीसाठी रुपाली पाटील यांना उमेदवारी जाहीर करत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांच्या अगोदर आघाडी घेतली आहे. आता अभिजित बिचुकले यांनी पुन्हा एकदा पदवीधर संघाच्या निवडणुकीद्वारे राजकारणात जोरदार एंट्री घेतली असून ते आपले नशीब आजमावणार आहे. 

 या संदर्भात बिचुकले म्हणाले, विविध निवडणुकींना आजपर्यंत सामोरे गेलो आहे. त्यात यश जरी मिळाले नसले तरी मी निराश झालेलो नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या जिद्दीने राजकारणात सक्रिय झालो असून शनिवारी मी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. पदवीधर संघाच्या निवडणुकीत मतदारांनी पैसा आणि इतर कोणत्याही आमिषाला बळी न पडता सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करावे. त्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवारालाच त्यांनी मतदान केले पाहिजे.

आजपर्यंत मला महाराष्ट्र आणि साताऱ्यातील जनतेने भरभरून प्रेम दिले आहे. त्याचप्रमाणे माझ्या चाहत्यांचीही मला इथपर्यंतच्या प्रवासात मोठी साथ लाभली आहे. मात्र, राजकारणातील पैसा आणि बलाढ्य सत्तेमुळेच आजतागायत लढवलेल्या निवडणुकीत माझा विजय होऊ शकला नाही. मात्र आता पदवीधर निवडणुकीकडे प्रत्येक मतदाराने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. परिवर्तनाची हीच योग्य वेळ आहे.   

या निवडणुकीत माझ्या प्रचाराचा अजेंडा हा शिक्षण आणि नोकऱ्यांना प्राधान्य हा आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मला एक संधी द्यावी. विधानसभेच्या सभागृहात मतदारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडून ते मार्गी लावण्याचा माझा कायम प्रयत्न असेल, असेही बिचुकले यांनी जाहीर केले आहे. 

भाजपाकडून पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची यादी जाहीर.. राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे.  भाजपाकडून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्राम देशमुख, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांच्या उमेदवारीची घोषणा दिल्लीवरून करण्यात आली आहे. शिरीष बोराळकर हे पंकजा मुंडे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यामुळे या निमित्ताने पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.

 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणBigg Boss Marathiबिग बॉस मराठीElectionनिवडणूक