Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 16:44 IST2024-10-03T16:40:13+5:302024-10-03T16:44:52+5:30
अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला हा लोकप्रिय कार्यक्रम 6 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी, प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांचा एक व्हडिओ समोर आला आहे.

Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
यावेळच्या हिंदी बिग बॉसमध्येगुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री होणार आहे. हा हिंदी बिग बॉसचा 18 वा सीझन असून यात एकूण 18 कन्टेस्टंट सहभागी होणार आहेत. अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला हा लोकप्रिय कार्यक्रम 6 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी, प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांचा एक व्हडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ते टीव्ही9 मराठी या वृत्त वाहिणीच्या पत्रकारासोबत बोलत असताना, प्रेमाणे 'चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा' म्हणत कॅमॅरेऱ्यासमोर पत्नीची पप्पी घेताना दिसत आहेत.
सांगितला सदावर्ते आडणावाचा अर्थ -
आज आपली बीगबॉसच्या घरामध्ये ग्रॅन्ट एन्ट्री होत आहे? असे विचारले असता, सदावर्ते मोठ्याने हसले आणि म्हणाले, आम्ही सदावर्ते आहोत, सदावर्ते, याचा अर्थ जाणून घ्या, आम्ही राजाच्या राज्याच्या वरचे वर्ते आहोत. आगे आगे देखो होता है क्या? बिगबॉसच्या घरात 18 कन्टेस्टंट असणार आहेत. त्यांपैकी तुम्ही एक आहैत, काही दडपण आहे का? असे विचारले असता, सदावर्ते म्हणाले, आपले नावच 'काफी' आहे, आपण 'गुणरतन' आहोत. एक गुणरत्न लाख गुणरत्न म्हणतात. आपले नावच पुरेसे आहे. अरे लोक आपल्याला घाबरतात. आपण तर 'डंके की चोट पर' बोलतो. त्यामुळे आपण कसलीही फिकीर करत नाही, लोकच आपली फिकीर करतात.
केवळ नावच पुरेसे आहे, सदावर्ते... -
यावेळी, पती बिग बॉसच्या घरात जात आहेत, काही महत्वाचा सल्ला दिलाय का? असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, "तो नेहमीच विनर असलेला माणूस आहे. अत्ताच त्यांनी सांगितलं की सदावर्ते म्हणजे वर आणि त्यांना आता कुठल्याही सल्ल्याची गरज पडणार नाही. कारण त्यांनी प्रत्यक्षात सर्वांना दाखवून दिले आहे की, ते काय आहेत. केवळ नावच पुरेसे आहे, सदावर्ते...
अन् सदावर्ते यांनी याजश्री पाटील यांची प्रेमाने पप्पी घेतली -
जयश्री पाटील यांच्या या उत्तरावर गुणरत्न सदावर्ते जाम खूश झाले आणि त्यांनी 'चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा...' म्हणत जयश्री पाटील यांची सर्वांसमोर पप्पी घेतली. यावेळी दोघेही अत्यंत खूश दिसत होते.