उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिदेंच्या शिवसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 20:24 IST2025-01-18T20:23:39+5:302025-01-18T20:24:17+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर अनेक विरोधनेते सत्तापक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे, निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला एकावर एक धक्के बसत आहेत. आता उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील ठाकरे गटाच्या दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला. या निवडणुकीनंतर ठाकरे गटातील अनेक नेते, पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश करताना दिसत आहेत. आता नाशिकमधील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला.
नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरीमधील अंदाजे दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत सामील झाले. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणर आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.