शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला खिंडार! बड्या नेत्याची शिंदे गटात एन्ट्री; मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:03 IST

Maharashtra Political Crisis: महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाची ताकद वाढत चालल्याने उद्धव ठाकरेंसमोर संघटना वाचवण्याचे आव्हान असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली. गेल्या अनेक दिवसांमधील या घटनाक्रमांमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. यातच आता पुण्यात शिवसेनेला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहेत. एका बड्या नेत्याने शिंदे गटात एन्ट्री घेतली आहे. 

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला जय महाराष्ट्र केल्यामुळे आता शिवसेनेची चिंता वाढल्याचे म्हटले जात आहे. आता फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे बडे नेते शिंदे गटात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. आधी माजी मंत्री आणि शिवसेनेचे मोठे नेते विजय शिवतारे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता. तसेच विधानसभेत आणखी चार-पाच जण येऊ शकतात, असा दावा करण्यात आला होता. यातच आता पुण्यातील बडे नाव असणारे नाना भानगिरे हे शिंदे गटात सामील झालेत.

हडपसर भागात भानगिरे यांचे मोठे प्रस्थ

हडपसर भागात भानगिरे यांचे मोठे प्रस्थ आहे. नाना भानगिरे शिंदे गटात सामील झाल्याने आगामी काळात हा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे. भानगिरे यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून नाना भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे. नाना भानगिरे हे आतापर्यंत पुणे महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी तीन वेळा हडपसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती.

दरम्यान, हडपसर भागात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या नाना भानगिरे यांच्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा गट शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक मुंबईत गेले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गटाला चर्चेचे निमंत्रण दिल्याची माहिती आहे. पुणे महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. अशात आधीच पुण्यात शिवसेनेची ताकद जेमतेम असल्याने भानगिरे यांच्या रूपाने शिंदे गट पुणे शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळPuneपुणेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे