शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:11 IST

CM Devendra Fadnavis News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमची महायुती चांगली कामगिरी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

CM Devendra Fadnavis News: दुर्दैवाने आज काँग्रेस पक्षात दिशाहीन नेतृत्व दिसत आहे. त्यामुळे ज्यांना काम करायचे आहे. देशासाठी, समाजासाठी काहीतरी करायचे आहे, त्यांना आपले भवितव्य त्या ठिकाणी दिसत नाही. ज्या प्रकारचे निर्णय होतात. आपल्या सैनिकांच्या विरुद्धच बोलले जाते. सैन्याच्या विरोधात बोलले जाते. त्यामुळे आता त्या कार्यकर्त्यांना तोंड काय दाखवायचे. आपलाच नेता भारतीय सैन्याविरोधात बोलत असेल, तर कार्यकर्त्यांनी उत्तर काय द्यायचे, त्यामुळे काँग्रेस पक्षात मोठी निराशा आपल्याला पाहायला मिळत आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. ते पत्रकारांशी बोलत होते. 

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी काँग्रेस पक्षातून सातत्याने मोठी घराणी भाजपामध्ये दाखल होत आहेत. काँग्रेसचे नेतृत्व सातत्याने अपयशी ठरत आहे किंवा चुकांमधून बोध घेण्यास कमी पडत आहे, असे वाटते का, अशा आशयाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस पक्ष एक प्रकारे दिशाहीन झालेला आहे. आम्ही अनेक वर्षे विरोधी पक्षात काम केले. सत्तेही राहिलो, पण विरोधी पक्ष म्हणून जास्त राहिलो. विरोधी पक्षात असताना आम्ही देशहिताची लाइन कधी सोडली नाही. समाजहिताचा विचार कधी सोडला नाही. म्हणून समाज आमच्यासोबत आला. म्हणून लोक आमच्यासोबत आले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती चांगली कामगिरी करेल

विशेष करून जे जमिनीशी जोडलेले नेते आहेत, त्या नेत्यांचे कुठेतरी खच्चीकरण करायचे, अशा प्रकारचीही परिस्थिती दिसते. म्हणूनच अशा प्रकारचे नेतृत्व आमच्याकडे येत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. निवडणुका असो वा नसो, चांगली मंडळी आम्ही पाहत असतो. चांगली मंडळी दिसली की आम्ही त्यांना पक्षात घेऊन येतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसत्या, तरी आम्ही हा प्रयत्न सोडला नसता, आम्ही हा प्रयत्न केलाच असता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमची महायुती चांगली कामगिरी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.  

दरम्यान, जयश्रीताई पाटील यांच्यासह ज्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्यांना एवढेच सांगतो की, भारतीय जनता पार्टी आपला परिवार आहे. त्यामुळे परिवारासारखीच वागणूक या ठिकाणी तुम्हाला मिळेल. तुम्ही आता या परिवाराचे भाग झालेले आहात. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची काळजी घेणे आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. ज्या-ज्या ठिकाणी ज्याला जसे काम देणे आवश्यक आहे, जी जबाबदारी देणे आवश्यक आहे, ते त्यांना दिले जाईल. आपण बाहेरून आलो आहोत, अशी भावना कुणाचीही होणार नाही, अशी गॅरंटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसSangliसांगली