शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 08:07 IST

Deputy CM Eknath Shinde News: एकनाथ शिंदे म्हणाले की, भिऊ नको तुझ्या पाठीशी आहे. दिलेला शब्द पाळणारा हा आमचा नेता आहे, असे सांगत काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Deputy CM Eknath Shinde News: विधानसभा निवडणुकीनंतर आता होत असलेल्या राज्यभरातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वच पक्षांना लागलेले आहेत. सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. एकीकडे ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक, हजारो कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असून, आता काँग्रेसमधील नेतेही शिवसेना शिंदे गटात येताना पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आयोजित केलेल्या शिवसेना मेळाव्यात माजी मंत्री व काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. याबाबत एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून या भागाचा विकासासाठी नक्की आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या सभेसाठी तब्बल ११ तास अक्कलकोट येथील स्थानिक नागरिकांनी माझी प्रतिक्षा करत ते माझ्यासाठी थांबून राहिले. त्यांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास पाहून त्यांच्या समोर मी नतमस्तक झालो, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. 

जिथे दिशा नाही तिथे दशा झाली

सिद्धाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी असून म्हेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील हे या परिसरातील एक मोठे प्रस्थ होते. म्हेत्रे परिवाराने कधी जात, धर्म, पक्ष न बघता येथील स्थानिक नागरिकांची प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सिद्धाराम यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. जिथे दिशा नाही तिथे दशा झाली. सिद्धाराम म्हेत्रे अनुभवी आहेत, त्यामुळे ते आता शिवसेनेत आल्याने आता सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

दरम्यान, १९५७ पासून आम्ही काँग्रेस सोबत होतो. जिल्हात आमचे एकमेव घराणे आहे ज्याने कधीच पक्ष बदलला नव्हता. मध्य प्रदेशच्या लोकांनीही आपल्याला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यास सांगितले. त्यामुळेच शिवसेनेत जाण्याचे निश्चित केले. ही स्वामींची नगरी, स्वामी म्हणतात, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. तसेच मला एकनाथ शिंदे म्हणाले की, भिऊ नको तुझ्या पाठीशी आहे. दिलेला शब्द पाळणारा हा आमचा नेता, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे म्हेत्रे म्हणाले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाSolapurसोलापूरcongressकाँग्रेस