शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओमध्ये लवकरच होणार मोठी भरती; ४६१ सहायक निरीक्षक पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 04:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य परिवहन विभागाने ४६१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (एआयएमव्ही) पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य परिवहन विभागाने ४६१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (एआयएमव्ही) पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. अलीकडेच झालेल्या पदोन्नती प्रक्रियेत ३२८  एआयएमव्हीना निरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या अंमलबजावणीसाठी एआयएमव्हीची संख्या कमी पडत असल्याने प्रस्ताव पाठवल्याचे अधिकारी म्हणाले. 

परिवहन विभागामध्ये एकूण १,१५८ एआयएमव्ही पदे मंजूर आहेत, तर त्यापैकी सध्या ७८५ पदे भरलेली आहेत. त्यामुळे अजूनही ३० टक्के पदे रिक्त आहेत. फील्डवरील कामकाजाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सक्षम सार्वजनिक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ही पदे भरणे आवश्यक असल्याचे अधिकारी म्हणाले.

यासोबतच सहायक आरटीओ कॅडरमध्ये अद्याप काही पदे रिक्त आहेत. मंजूर १८३ पदांपैकी १४०हून अधिक पदे भरली गेली असून, सुमारे ४२ पदे अद्याप रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी २१ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली असून, ५१ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनुष्यबळ वाढल्यानंतर आरटीओकडून रस्ते सुरक्षा मोहिमा अधिक तीव्र करण्यात येतील. इंटरसेप्टर वाहने, रडार प्रणाली, वेगमर्यादा तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली जाणार आहेत. वेळेवर मंजुरी आणि भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळतील आणि रस्ते सुरक्षेतही वाढ होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सहायक निरीक्षक पार पाडतात महत्त्वाची कामेसहायक निरीक्षकांच्या माध्यमातून वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट, वाहन तपासणी अशी अनेक महत्त्वाची कामे पार पडली जातात.ही कामे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यांना यांत्रिक व तांत्रिक ज्ञान, मोटार वाहन कायद्याची माहिती, प्रामाणिकपणा आणि निर्णयक्षमता, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती यांची तपासणी करून निवड होणे आवश्यक असते.सहायक निरीक्षकांची संख्या वाढल्याने अंमलबजावणी, नियमांचे पालन यावर अधिक प्रभावी देखरेख ठेवता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : RTO to Recruit 461 Assistant Inspectors Soon: Proposal Submitted

Web Summary : Maharashtra's transport department proposes filling 461 Assistant Motor Vehicle Inspector posts. Promotions created vacancies, impacting enforcement. The recruitment aims to improve public service, road safety, and stricter rule enforcement with dedicated teams and advanced equipment.
टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस