CoronaVirus News : मोठी बातमी! मंगल कार्यालयांत लग्नसमारंभास ठाकरे सरकारची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 07:08 IST2020-06-23T04:41:06+5:302020-06-23T07:08:05+5:30
CoronaVirus News : याबाबतचा आदेश मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी सोमवारी काढला.

CoronaVirus News : मोठी बातमी! मंगल कार्यालयांत लग्नसमारंभास ठाकरे सरकारची परवानगी
मुंबई : खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, सभागृहांमध्ये लग्न समारंभ आयोजित करण्यात राज्य शासनाने परवानगी दिली. मात्र या समारंभात जास्तीतजास्त पन्नास जण उपस्थित राहू शकतील. याबाबतचा आदेश मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी सोमवारी काढला.
घरात किंवा घराच्या परिसरात लग्न समारंभ आयोजित करण्याची पूवीर्ची परवानगी कायम राहील. २५, २९ आणि ३० जून रोजी लग्नाची दाट तिथी आहे. आजच्या आदेशामुळे घरी लग्न असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत लॉकडाऊनच्या काळात मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ आयोजित करण्यात मनाई होती.