शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

Eknath Khadse: मोठी बातमी! एकनाथ खडसे यांना ED कडून समन्स, कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 19:41 IST

Eknath Khadse ED : यापूर्वी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना ईडीकडून करण्यात आली होती अटक. एकनाथ खडसे यांनी ईडीनं बजावलं समन्स.

ठळक मुद्देयापूर्वी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना ईडीकडून करण्यात आली होती अटक.एकनाथ खडसे यांनी ईडीनं बजावलं समन्स.

भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना रात्री ईडीने अटक केली. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला होता. परंतु त्यानंतर आता सक्तवसूली संचलनालयानं एकनाथ खडसे यांना समन्स बजावलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसूली संचलनालयानं (ED) समन्स बजावलं आहे. तसंच त्यांना गुरूवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी (Bhosari land scam) खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर त्यांचे जावई गिरीश  चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. मंगळवारी दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली. यापूर्वी चौधरी यांना अटकगिरीश चौधरी यांना ईडीनं मंगळवारी रात्री अटक केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यादेखील अडचणी वाढतील की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होतं. झोटिंग समितीने आपल्याला क्लिन चिट दिल्याचे खडसे यांनी सांगितलं होतं. मात्र, पदाचा गैरवापर करून खडसे यांनी या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमिन एमआयडीसीची होती असं नंतर समोर आलं होतं.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMIDCएमआयडीसीMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेस