शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पहिल्यांदाच ‘महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 15:37 IST

आरोग्य विभागातर्फे  मेळावे, शिबिरांद्वारे जनजागृती करण्यात येते; परंतु आवश्यक तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे़.

ठळक मुद्देकैैलास बाविस्कर : जनजागृतीसाठी आरोग्य विभागाचा उपक्रम, दोन प्रकारांत होणार स्पर्धाविविध आजारांवर शासनाकडे असणाऱ्या योजनांची माहिती पोहोचवण्याचे काम सुरू २९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफआय) भांडारकर रोड येथे हे फेस्टिव्हल होणार

दुर्गेश मोरे । पुणे : आरोग्यविषयक समस्या; तसेच शासनस्तरावर असलेल्या आरोग्यदायी योजनांबाबत नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात प्रथमच 'महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हल-२०२० ' चे आयोजन करण्यात आले आहे़  दरम्यान, यावेळी राज्यस्तरीय आरोग्यविषयक व्हिडिओ स्पॉट आणि माहितीपट अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा होणार असल्याची माहिती राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ़ कैैलास बाविस्कर यांनी दिली.आरोग्य विभागातर्फे  मेळावे, शिबिरांद्वारे जनजागृती करण्यात येते; परंतु आवश्यक तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे़. यावर वारंवार विविध उपाय-योजनाही करण्यात आल्या असून, अनेक नवनवीन उपक्रम राबवून विविध आजारांवर शासनाकडे असणाऱ्या योजनांची माहिती पोहोचवण्याचे काम सुरू आहे़. त्याचाच एक भाग म्हणून  महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे़. २९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफआय) भांडारकर रोड येथे हे फेस्टिव्हल होणार आहे़. यामध्ये नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची; तसेच आजारांबाबत माहिती मिळणार आहे़. जेणेकरून कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेणे शक्य होईल. चित्रफितींचा प्रभाव मानवी जीवनावर अधिक होत असल्यामुळे; तसेच नवोदितांसाठी एक चांगली संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हलमध्ये आरोग्यविषयक व्हिडिओ स्पॉट आणि माहितीपट अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा घेणार आहे. यामध्ये माता आरोग्य, बाल आरोग्य, मानसिक आरोग्य, टीबी यांसारख्या आजारांवर आरोग्यविषयक व्हिडिओ स्पॉट (१ मिनिट), तर माहितीपट (१० मिनिटे) तयार करावयाचा आहे़. या स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश असून, महाआरोग्य फि ल्म फे स्टिव्हलच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे़ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १ फेब्रवारी २०२० अंतिम मुदत आहे............1आरोग्यविषयक व्हिडिओ स्पॉट (१ मिनिट), तर माहितीपट (१० मिनिटे) अशा दोन प्रकारांमध्ये होणाºया स्पर्धेसाठी प्रत्येकी तीन बक्षिसे देण्यात येणार आहे़ तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्यात येणार असून त्याद्वारे विजेत्यांची निवड होईल़............2 प्रथक क्रमांकासाठी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र; तसेच रोख २५ हजार रुपये, द्वितीय स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र; तसेच रोख १५ हजार रुपये, तृतीय स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र; तसेच रोख १० हजार रुपये, तर उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र; तसेच रोख ५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.............आतापर्यंत राज्यातून सुमारे ६० ते ७० जणांनी या स्पर्धेची माहिती घेतली आहे़, तर संकेतस्थळावर चार ते पाच जणांनी नावनोंदणीही केली आहे़ अंतिम मुदतीपर्यंत २० ते ३० स्पर्धक सहभागी होतील, अशी अपेक्षा असल्याचे  राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक कैैलास बाविस्कर यांनी सांगितले़

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य