शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

राज्य सरकारचा 'मोठा निर्णय' ; कोरोनाबाधित रुग्णांना रेमडिसेव्हिर मिळणार 'या' अल्प दरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 2:11 PM

मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रेमडिसेव्हिर हे इंजेक्शन दिले जाते...

ठळक मुद्देप्रत्येक जिल्ह्यात किमान एक औषध दुकान निश्चित इंजेक्शनची मागणी वाढल्याने मागील महिन्यांत निर्माण झाला होता प्रचंड तुटवडा

पुणे : खासगी रुग्णालयांतील रुग्णांना निश्चित व अल्प दरात रेमडिसेव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक औषध दुकान निश्चित करण्यात आले आहे. राज्यात एकुण ५९ दुकाने निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये २ हजार ३६० रुपयांना एक इंजेक्शन मिळणार आहे.

मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रेमडिसेव्हिर हे इंजेक्शन दिले जाते. मात्र, या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मागील महिन्यांत प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत होती. संपुर्ण राज्यातच ही स्थिती निर्माण झाल्याने रुग्णांना वेळेत इंजेक्शन मिळत नव्हते. आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे. पण इंजेक्शनची किंमत जास्त असल्याने खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.यापार्श्वभुमीवर आरोग्य विभागाने इंजेक्शन अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या दरात इंजेक्शन मिळण्याची दुकानेही निश्चित करण्यात आली आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे यावर नियंत्रण राहणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून जिल्ह्याची दैनिक गरजेनुसार आरोग्य विभागाकडे मागणी केल्यानंतर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल. या योजनेतील उत्पादक कंपन्यांकडून दररोज ५ हजार इंजेक्शन देण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांकडे रुग्णांच्या माहितीसह इंजेक्शनची मागणी करावी लागेल. रुग्णाला गरज आहे की नाही, हे पाहिल्यानंतर त्याला मान्यता दिली जाईल. त्यानंतर संबंधित औषध दुकानांमध्ये इंजेक्शन मिळेल. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत.-------------योजनेअंतर्गत रेमडेसिव्हीरची किंमत (प्रति १०० ग्रम व्हायल) - २,३६० रुपये---------------विभागनिहाय औषध दुकानांची संख्यापुणे - १३मुंबई - ५नाशिक - ९नागपुर - ५औरंगाबाद - ११कोकण - १०अमरावती - ५-----------------पुणे जिल्ह्यातील औषध दुकाने -१. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, ससून रुग्णालय२. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, चिंचवड३. महासंघ मेडिकल्स, वायसीएम रुग्णालय, पिंपरी४. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, बारामती-----------------

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं