शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नव्या आमदारांचे मोठे मरण! अजितदादा की शरद पवार, सरोज अहिरेंनी सांगितले कसे निवडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 18:47 IST

माझ्या कामासाठी मी देवगिरीवर गेले होते. मी सही केली म्हणून माझा पाठिंबा त्यांनी गृहीत धरला आहे. - सरोज अहिरे

राष्ट्रवादीतील बंडाळीवर अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एक निवडणे अवघड आहे. नवीन आमदारांचे प्रचंड मरण आहे, असे त्या म्हणाल्या. आज त्या दोन्ही गटांच्या बैठकांना गैरहजर होत्या. याचे कारणही त्यांनी सांगितले. 

आमच्या सारख्या आमदारांची अडचण होत आहे. माझ्या कामासाठी मी देवगिरीवर गेले होते. त्यामुळे मी सही केली आणि शपथविधीला गेले. सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाली. शरद पवारांशीही बोलले. चार तारखेला माझी सर्जरी होती. माझे बाळ लहान असल्याने मी निघून आले. आमच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास, म्हणून मी सही केली होती. इतर आमदारांनी पण सही केली होती, असा गौप्यस्फोट सरोज अहिंरेंनी केला आहे.  

जनतेच्या मतावर मी आमदार झाले आहे. मतदारांचा कौल घेऊन निर्णय घेणार आहे. माझी मानसिक स्थिती नाही. मला चॉइस करता येत नाहीय. मी सही केली म्हणून माझा पाठिंबा त्यांनी गृहीत धरला आहे. दोघांपैकी एकाला निवडणे म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे. आमचे असे क्षेत्र त्यात चर्चा होणारच, काही लोक असमाधानी म्हणून त्यांनी तक्रार केली असेल. माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी आहे. एक वर्षांनी निवडणुका म्हणून हा मोठा प्रश्न आहे. रुग्णालयातील आटोपले की मी बोलणार आहे, असे त्या म्हणाल्या. 

आई आणि बायको यातून निवडणे जसे कठीण तसे ही बाब माझ्यासाठी कठीण आहे. येवल्यात होणाऱ्या सभेत मी बरे वाटले तर जाणार आहे. काही कामांना स्थगिती होती, सीएमना हात जोडून स्थगिती उठवली आहे. जनता म्हणाली, कामे नको म्हणाली तर शरद पवारांबरोबर जाईन. पण विकासकामे म्हटले तर अजित पवारांसोबत जाणार, असे अहिरे यांनी स्पष्ट केले. राजकारणात कधी काहीही होऊ शकते मी आकलन करू शकत नाही. मतदार संघातील प्रमुख लोकांशी वन टू वन चर्चा करेन व नंतर माझी भूमिका जाहीर करेन, असे अहिरे म्हणाल्या. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNashikनाशिकSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष