“१०० दिवसांत एक विकेट गेली, ६ महिने थांबा आणखी एक जाणार आहे”; सुप्रिया सुळेंचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 09:52 IST2025-03-17T09:51:53+5:302025-03-17T09:52:49+5:30

NCP SP MP Supriya Sule News: जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्याोग करतो, त्याचा बळी जाईल. लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. एक वेळ संपूर्ण आयुष्यभर विरोधात बसेन, पण नैतिकता सोडणार नाही. यांनी पक्ष सोडला नसता तर मी बाहेर पडले असते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

big claims made ncp sp mp supriya sule that another politician leader downfall prediction in next six month | “१०० दिवसांत एक विकेट गेली, ६ महिने थांबा आणखी एक जाणार आहे”; सुप्रिया सुळेंचा रोख कुणाकडे?

“१०० दिवसांत एक विकेट गेली, ६ महिने थांबा आणखी एक जाणार आहे”; सुप्रिया सुळेंचा रोख कुणाकडे?

NCP SP MP Supriya Sule News: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा भेट द्या. तिथे काय परिस्थिती आहे ते कळेल. देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना दूरध्वनी आले होते. ही बाब मला मिळालेल्या एका माहितीतून समोर आली आहे. फोन सुरू असताना त्यांची हे गंमत पहात होते. ही खूप मोठी विकृती आहे. अवादा कंपनीला काम मिळू नये, म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्रे दिली आहेत. पत्रही त्यांनी द्यायची आणि खंडणीही त्यांची घ्यायची, असा प्रकार आहे. हाच आकाचा तोच आका आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा आढावा बैठकीला सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे. त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही, असा मोठा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, तर्क-वितर्क लावले जात आहेत.

एक वेळ विरोधी पक्षांमध्ये राहीन, पण नैतिकता सोडणार नाही

जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्याोग करतो, त्याचा बळी जाईल. हिंमत असेल तर, समोर येऊन लढावे ही लढाई मोठी आहे. मला कधी वाटते की, बरे झाले पक्ष फुटला. जो स्वतःच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो आणि तिला अडकवतो. काही नैतिकता आहे की नाही? अशा व्यक्तीबरोबर पक्षात काम करू शकले नसते. एक वेळ विरोधी पक्षांमध्ये आयुष्यभर राहीन. पण, नैतिकता सोडणार नाही. एक तर ते पक्षात राहिले असते नाहीतर मी बाहेर पडले असते. पैसा आणि सत्तेच्या पुढे झुकणे बंद केले पाहिजे. अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढले पाहिजे. राज्यातील एक मंत्री खूपच बोलत आहेत. परंतु ते बायकोच्या आड लपतात आणि बायकोच्या आडून बोलतात. हे डरपोक मंत्री कोण आहेत, लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. चार-सहा महिन्यांत त्यांची विकेट पडेल, असा मोठा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.

दरम्यान, एवढी वर्षे आपण सत्तेत राहिलो. आता आपण विरोधी पक्षात आहोत. अरे बापरे, मग आता विरोधी पक्षात राहून संघर्ष करायचा का? केवढा मोठा प्रश्न आहे, ही मानसिकता मनातून काढून टाकून संघर्षासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उभे राहिले पाहिजे. पक्षाकडून मतदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. हार-जीत सुरूच असते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

 

Web Title: big claims made ncp sp mp supriya sule that another politician leader downfall prediction in next six month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.