शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

भाजपाला मोठा धक्का, जळगाव जिल्ह्यातील ११ नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधले शिवबंधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 20:01 IST

Maharashtra Politics News: राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. त्यातच आज शिवसेनेने भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या जळगावमध्ये भाजपाला मोठा दणका दिला आहे.

जळगाव/मुंबई - राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. त्यातच आज शिवसेनेने भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या जळगावमध्ये भाजपाला मोठा दणका दिला आहे. जळगावमधील मुक्ताईनगर तसेच बोधवड नगरपालिकांमधील ११ नगरसेवकांना फोडत शिवसेनेने भाजपाला भगदाड पाडले आहे. दरम्यान, या ११ नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. (Big blow to BJP, 11 corporators from Jalgaon district joins Shiv sena in the presence of CM Uddhav Thackeray)

भाजपाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणारे हे नगरसेवक खडसे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यापासून अनेक लोकप्रतिनिधींनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान  एकनाथ खडसे समर्थक असलेल्या मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेमधील या ११ नगरसेवकांनी आज भाजपाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधत या नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला. यावेळी शिवसेनेचे जळगावमधील नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. 

या नगरसेवकांनी शिवसेनेत केलेला प्रवेश हा भाजपासाठी मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात जळगावमध्ये भाजपाला पडणारे खिंडार रोखण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपाShiv Senaशिवसेना