शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"भुजबळसाहेब, बांधावर येऊ नका, जमिनीचा ७/१२ आमच्या बापाचा", छगन भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 08:54 IST

आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलनाला आव्हान छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातील ४६ गावांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.

नाशिक :  राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. मात्र, छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला येवला मतदारसंघातून विरोध होत आहे. त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलनाला आव्हान छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातील ४६ गावांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांना त्यांच्याच येवला मतदारसंघातून विरोध होत आहे. छगन भुजबळ आज गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याआधीच छगन भुजबळांना विरोध करण्यात येत आहे. तसेच, छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारी एक ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये छगन भुजबळांना गावबंदी करायला महाराष्ट्राचा ७/१२ तुमच्या नावावर आहे काय? या विधानाची आठवण करून देत सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे, गावाच्या बांधावर येऊ नये, जमिनीचा ७/१२ आमच्या बापाचा आहे, असे म्हटले आहे.  

याचबरोबर, छगन भुजबळ यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी दौरा करणार असल्याचे पत्रक जाहीर केले. यानंतर लासलगाव परिसरातील जवळपास ४६ गावांतील प्रतिनिधींची बैठक बुधवारी लासलगाव बाजार समितीच्या आवारात झाली. सोशल मीडियावरील आवाहनावरून ही बैठक झाली. त्याला मोठी गर्दी जमली होती. या बैठकीतील चर्चा व माहिती गोपनीय ठेवण्याची व त्यातील निर्णयावरील माहिती आज जाहीर करण्याचा निर्णय झाला. सकल मराठा समाजाच्या आवाहनावरून ही बैठक झाली. त्यात लासलगाव-येवला परिसरातील ४६ गावांतील विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

मला गावबंदी कोणी करू शकत नाही : छगन भुजबळअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बुधवारी रात्री येवल्यात दाखल झाले. गुरुवारी सकाळी ते शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मला गावबंदी कोणी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. मराठ्यांना जर ओबीसीमध्ये बळजबरीनं टाकलं तर त्यांना काहीच मिळणार नाही, मराठा समाजातील समजूतदार लोकांना हे लक्षात येते असेही छगन भुजबळ म्हणाले.  

व्हायरल ऑडिओ क्लिप?ग्रामस्थ : भुजबळ साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो येऊ नका, आमच्या गावच्या बांधावर येऊ नका....छगन भुजबळ: बघू काय करायचे ते? ग्रामस्थ : तुम्ही आले तर वातावरण खराब होईल. सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे गावाच्या बांधावर येऊ नये छगन भुजबळ: बरं....ग्रामस्थ : जमीनीचा ७/१२ आमच्या बापाचा आहे. छगन भुजबळ: मला कोणी म्हटलं या तर मी जाईल, नाही म्हटलं तर बघू...ग्रामस्थ : तुम्हाला कोणी या म्हणत नाही... आमच्या गावचा ठराव झाला आहे. त्यामुळे तुम्ही येऊ नका.. छगन भुजबळ:  तुम्ही चार लोक म्हणजे ठराव होतो का?

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणNashikनाशिकmarathaमराठा