शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

भुजबळांना हायकोर्टाचा दिलासा

By admin | Updated: November 16, 2016 05:38 IST

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांना पीएमएलएच्या (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट) तरतुदीला आव्हान

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांना पीएमएलएच्या (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट) तरतुदीला आव्हान दिलेली याचिका मागे घेण्याची परवानगी मंगळवारी उच्च न्यायालयाने दिली. भुजबळ यांनी आव्हान दिलेल्या तरतुदीअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.‘भुजबळ यांना तपास यंत्रणेने कशा प्रकारे बेकायदेशीर अटक केली, हे सिद्ध करण्यासाठी नवी याचिका दाखल करायची आहे. त्यामुळे पीएमएलएच्या तरतुदीला आव्हान देणारी याचिका मागे घेण्याची परवानगी द्यावी,’ अशी विनंती भुजबळ यांच्यातर्फे ज्येष्ठ अ‍ॅड. विक्रम चौधरी यांनी न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाला केली. १४ मार्च रोजी छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग अ‍ॅक्टअंतर्गत अटक केली. त्यानंतर भुजबळ यांनी पीएमएलएच्या कलम १९ व ४५च्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. कलम १९ अंतर्गत ईडीला सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपीला अटक करण्याचा अधिकार आहे. तर कलम ४५मध्ये जामिनासंदर्भात नमूद करण्यात आले आहे. ही याचिका मागे घेऊन भुजबळांच्या बेकायदेशीर अटकेविरुद्ध हॅबिस कॉर्पस (हरवलेली व्यक्ती न्यायालयात हजर करण्यासंबंधी दाखल करण्यात येणारी याचिका) दाखल करू, असे अ‍ॅड. चौधरी यांनी खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)