भुजबळांना अंतत: न्याय मिळेलच - शरद पवार
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:58+5:302016-03-16T08:36:58+5:30
छगन भुजबळांची अटक राजकीय सूडापोटी झाली आहे काय, या प्रश्नावर तूर्त मी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुजबळांच्या पाठिशी उभा असून

भुजबळांना अंतत: न्याय मिळेलच - शरद पवार
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
छगन भुजबळांची अटक राजकीय सूडापोटी झाली आहे काय, या प्रश्नावर तूर्त मी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुजबळांच्या पाठिशी उभा असून कायदेशीर मार्गाने ही लढाई आम्ही लढू आणि या प्रक्रियेत भुजबळांना अंतत: न्याय मिळेल, याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी लोकमतशी बोलतांना केले.
भुजबळांच्या अटकेमागचे संदर्भ सांगताना पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षाचा एक खासदार वृत्तवाहिन्यांवर जाहीरपणे सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मी या अटकेची वाट पाहत होतो. त्यावरून या कारवाईमागे नेमके कोण?, याचा अंदाज तुम्ही करू शकता. भुजबळांबाबत जे काही घडते आहे, त्याचे आश्चर्य मला वाटत नाही. महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याविषयी बोलतांना पवार म्हणाले, तो निर्णय भुजबळांनी एकट्याने घेतला नव्हता. मोठ्या बांधकाम प्रकल्पाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती घेते, मुख्यमंत्री तिचे अध्यक्ष असतात.
या निर्णयामुळे एक पैसाही खर्च न करता देशाच्या राजधानीत अत्यंत सुरेख असे नवे महाराष्ट्र सदन उभे राहिले. सदर प्रकरणात भुजबळ कुटुंबीयांनी चौकशीत सहकार्य केले आहे. कायदेशीर मार्गाने ही लढाई आम्ही लढू.