लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: भाजपने महापौरपदाचे उमेदवार म्हणून नारायण चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष पडले. चौधरी यांच्या नावाला ज्येष्ठ नगरसेवक आणि भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील यांनी विरोध केला आहे. कार्यालयाने केल्यानंतर पक्षात दोन गट भाजपकडून महापौरपदासाठी इच्छुक असलेले सुमित पाटील यांच्या समर्थकांनी पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्याच्या पोस्ट केल्या आहेत.
भिवंडीत भाजपचे २२ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी १५ नगरसेवक माझ्यासोबत देव दर्शनासाठी बाहेर आहेत. नारायण चौधरी निवडणुकीआधी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ते पक्षाचे अधिकृत सदस्यदेखील नाहीत. त्यामुळे चौधरी यांच्या नावाची भाजप अधिकृत घोषणा कशी करेल, असा प्रश्न सुमित पाटील यांनी विचारला आहे.
भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये बिघाडी
काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व समाजवादी पक्षाने एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंट स्थापन केला आहे. त्यांनी महापौरपदावर दावा केला आहे. मात्र समाजवादीचे ६ नगरसेवक आ. रईस शेख यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. ते बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये बिघाडी झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे.
पत्रही भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी महापौरपदाच्या नावासाठी माझी अधिकृत घोषणा झाली आहे, असे नारायण चौधरी यांनी सांगितले. भाजप प्रदेश कार्यालयाकडून नारायण चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली असून तसे लेखी पत्र आमच्याकडे आले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे भिवंडी शहराध्यक्ष रवी सावंत यांनी दिली आहे.
Web Summary : BJP in Bhiwandi faces internal conflict over the mayoral candidate. Narayan Choudhary's nomination is opposed by Sumit Patil, leading to division within the party. Secular Front also sees turmoil, creating uncertainty in Bhiwandi's mayoral race.
Web Summary : भिवंडी में भाजपा महापौर पद के उम्मीदवार को लेकर आंतरिक कलह का सामना कर रही है। नारायण चौधरी के नामांकन का सुमित पाटिल विरोध कर रहे हैं, जिससे पार्टी में विभाजन हो गया है। सेक्युलर फ्रंट में भी उथल-पुथल है, जिससे भिवंडी के महापौर चुनाव में अनिश्चितता है।