Bhendwad ghat mandni: देशाचा राजा स्थिर राहील, पण...; नरेंद्र मोदींबाबत भेंडवड घटमांडणीचं मोठं भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 08:40 AM2021-05-15T08:40:26+5:302021-05-15T10:32:33+5:30

Bhendwad ghat mandni: भेंडवड घटमांडणी : पृथ्वीवर अनेक संकटे येतील. त्यामध्ये नैसर्गिक संकटे, रोगराई, परकीय घुसखोरी, अतिवृष्टी सारख्या आपत्तीला देशाला तोंड द्यावे लागेल.

Bhendwad ghat mandni: Many disasters on Earth, indications of low rainfall this year | Bhendwad ghat mandni: देशाचा राजा स्थिर राहील, पण...; नरेंद्र मोदींबाबत भेंडवड घटमांडणीचं मोठं भाकित

Bhendwad ghat mandni: देशाचा राजा स्थिर राहील, पण...; नरेंद्र मोदींबाबत भेंडवड घटमांडणीचं मोठं भाकित

googlenewsNext

- जयदेव वानखडे

जळगाव जामोद: तीनशे वर्षाची परंपरा लाभलेली सुप्रसिद्ध भेंडवड घटमांडणीची (Bhendwad ghat mandni) भविष्यवाणी आज दिनांक 15 मे रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केली. (Bhendwad ghat mandni told low rain, Earth in Trouble.)
     

 त्यानुसार यावर्षी भेंडवड घटमांडणी चे भाकितानुसार पर्जन्यमान कमी सांगितले असून जून महिन्यात कमी पाऊस येईल. सार्वत्रिक पाऊस होणार नाही.  जुलै महिन्यात सार्वत्रिक आणि चांगला पाऊस पडेल. या महिन्यात अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत. तर ऑगस्ट महिन्यामध्ये जून-जुलै पेक्षा कमी पाऊस पडेल. आणि सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी पाऊस सांगितला आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती ची शक्यता वर्तविली आहे. आणि पीक परिस्थिती साधारण राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा अवकाळी पावसाचे प्रमाणही कमी राहील. तर प्रचंड चाराटंचाई निर्माण होईल. त्यामुळे पशुधन संकटात येईल.


पृथ्वीवर अनेक संकटे येतील. त्यामध्ये नैसर्गिक संकटे, रोगराई, परकीय घुसखोरी, अतिवृष्टी सारख्या आपत्तीला देशाला तोंड द्यावे लागेल.
 देशाचा राजा कायम राहील मात्र त्याला प्रचंड संकटांचा सामना करावा लागेल. आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळलेली राहील. तर राजकीय परिस्थितीही अस्थिर असेल. नैसर्गिक संकटांमध्ये जीवित हानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता सांगितली आहे.  अशाप्रकारे भेंडवड घटमांडणी चे भाकीत जाहीर करण्यात आले.

Web Title: Bhendwad ghat mandni: Many disasters on Earth, indications of low rainfall this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.