शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सूक्ष्म सिंचनासाठी भवरलालजींचे योगदान ‘नोबेल’ पुरस्काराच्या तोडीचे - राज्यपालांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 4:04 AM

खान्देशच्या भूमीत शून्याचा शोध लावणा-या भास्कराचार्यांनंतर आठशे वर्षांनंतर जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी उच्च कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील कृषी क्षेत्राला एक नवी दिशा दिली

मुंबई : खान्देशच्या भूमीत शून्याचा शोध लावणा-या भास्कराचार्यांनंतर आठशे वर्षांनंतर जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी उच्च कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील कृषी क्षेत्राला एक नवी दिशा दिली. सूक्ष्म सिंचनासाठीचे त्यांचे योगदान ‘नोबेल’ पुरस्काराच्या तोडीचे आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले. भवरलालजींनी ग्रामीण भारतात उच्च कृषी तंत्रज्ञान व मायक्र ो इरिगेशनद्वारे (सूक्ष्म सिंचन) लाखो अल्पभूधारक शेतकºयांना समृद्ध केले. त्यांचे योगदान भारतातून ‘नोबेल’ पुरस्कारासाठी नक्कीच पात्र आहे, असे राज्यपाल म्हणाले.मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे रविवारी परमार्थ सेवा समितीतर्फे दिवंगत भवरलालजी जैन यांच्या जीवनकार्याचा सी. विद्यासागर राव व न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते ‘परमार्थ रत्न’ सन्मानाने गौरव करण्यात आला. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी हा सन्मान स्वीकारला. अत्यंत साधी जीवनशैली आयुष्यभर अंगीकारून सामान्यातून असामान्य कार्य त्यांनी निर्माण केले. कधीकाळी केरोसीन विकण्याच्या व्यवसायाला अंगीकारणाºया भवरलालजींनी केवळ ७ हजार रुपये भांडवलावर व्यवसायाची पायाभरणी केली. चार दशकांत जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारी बहुराष्ट्रीय कंपनी नावरु पास आणली, असेही राज्यपाल म्हणाले.गांधी विचारांवर नितांत श्रद्धालोकसहभागावर त्यांचा अधिक विश्वास होता. गांधी विचारांवर श्रद्धा ठेवत विश्वस्ताच्या भूमिकेतून उद्योगाला आकार देणाºया उद्योगपतींमध्ये जमनालाल बजाज यांच्यानंतर त्यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल, असे ज्येष्ठ गांधीवादी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणाले.जैन परिवारातर्फे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हृदयविकाराचे आव्हान स्वीकारत त्यांनी शेतकºयांसाठी कृषी उद्योगाला आकार दिला, असे ते म्हणाले. सोहळ््यास ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, कल्पतरु चे अध्यक्ष मोफतराज मुणोत, सुप्रिमचे अध्यक्ष महावीर तापडीया, पिरामल गृपचे दिलीप पिरामल, बिझनेस इंडियाचे अशोक अडवानी, बीग बाजारचे अध्यक्ष किशोर बियाणी, आयडीबीआयचे कार्यकारी संचालक अभय बोंगीरवार, परमार्थ सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण बियाणी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार