शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंची 'या' नेत्याने सोडली साथ; शरद पवारांच्या 'राष्ट्रवादी'त जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:59 IST

Bhausaheb Chikatgaonkar : मराठवाड्यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का बसला आहे. माजी आमदाराने शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजीनामा दिला आहे. आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे चर्चा आहे.  

Uddhav Thackeray Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एका नेत्याने जय महाराष्ट्र केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देणार असल्याचे सांगत माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 

वैजापूरचे माजी आमदार असलेल्या भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक असून, तयारीही करत आहेत. ठाकरेंकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्याने त्यांनी राजीनामा दिला. 

भाऊसाहेब चिकटगावकर काय म्हणाले?

"मी पक्षासाठी दोन वर्षांपासून काम करतोय. मात्र, ते (उद्धव ठाकरे) नवख्या उमेदवाराला तिकीट देणार असल्याचे समजते. मग या पक्षात राहून फायदा काय?", अशी नाराजी चिकटगावकरांनी व्यक्त केली. 

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  त्याचबरोबर पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करू, असे त्यांनी सांगितले.

शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी?

भाऊसाहेब चिकटगावकर पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा आता मतदारसंघात रंगली आहे. २०१४ ते २०१९ या काळात भाऊसाहेब चिकटगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. २०१९ मध्ये वैजापूर विधानसभेची जागा त्यांनी पुतण्यासाठी सोडली होती. 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा होती. वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे हे पक्ष फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्यानंतर चिकटगावकर यांनी ठाकरेंच्या गटात प्रवेश केला होता. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस