शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

भरत गोगवलेंची जीभ घसरली अन् मविआला पुन्हा बळं मिळालं; पाहा नेमकं काय झालं..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 14:27 IST

खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा चोरमंडळ उल्लेख केल्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले.

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त होत आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी राऊतांविरोधात हक्कभंगाची मागणी केली. यासाठी भाजपचे सर्व आमदार एकवटले आणि हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी सभागृह डोक्यावर घेतले. भाजपचे आमदार एकापाठोपाठ एक संजय राऊत यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करत होते. पण, यावेळी भरत गोगावले यांनी वापरलेल्या एका शब्दाने भाजपच्या मेहनतीवर पाणी फेरले.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलण्यासाठी एकेक करत भाजप आमदार आपली बाजू मांडत होते. यादरम्यान शिंदे गटाचे नेते भरत गोगावले उठले आणि संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली. यावेळी गोगावले यांनी सभागृहात असंसदीय शब्दाचा उल्लेख केला. त्यांनी तो शब्द उच्चारताच महाविकास आघाडीच्या आमदारांनी प्रत्युत्तरात सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

काय म्हणाले भरत गोगावले?संजय राऊतांनी विधिमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केला. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात, ती मर्यादा ओलांडल्यानंतर 'अती तेथे माती' होते. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई झालीच पाहिजे. या माणसाला विधिमंडळाला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? माणसाने इतकंही ***** नसलं पाहिजे. त्यामूळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणा,' असं भरत गोगावले म्हणाले. भरत गोगावेलेंच्या त्या शब्दानंतर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले. 

यावेली ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर उठले आणि गोगावले यांच्या शब्दाचा समाचार घेतला. बाहेर बोलल्या गेलेल्या गोष्टी सभागृहात काढतात, मग इकडे त्यांनी जो आक्षेपार्ह शब्द वापरला, तो मागे घेतले पाहिजे, असा पवित्रा त्यांनी घेतला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं वक्तव्य तपासून घेऊ, असं म्हणत कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन