भंडारा अग्निकांड : सिव्हील सर्जन अखेर निलंबित; एकाची बदली, तिघांची सेवा समाप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 01:17 AM2021-01-22T01:17:05+5:302021-01-22T06:53:53+5:30

या दुर्घटनेचा बोध घेऊन राज्य शासनाच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसात हेल्थ ऑडिट करण्यात येणार आहे.

Bhandara fire Civil surgeon finally suspended; Replacement of one, termination of service of three | भंडारा अग्निकांड : सिव्हील सर्जन अखेर निलंबित; एकाची बदली, तिघांची सेवा समाप्त

भंडारा अग्निकांड : सिव्हील सर्जन अखेर निलंबित; एकाची बदली, तिघांची सेवा समाप्त

Next

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने बुधवारी सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली, एसएनसीयूच्या विभाग प्रमुख, परिचारिका यांच्यावर निलंबनाची कारवाई तर दोन अधिपरिसेविका व एक बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी येथे दिली.

भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना निलंबित करण्यात आले आहे. तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनीला बडे यांची अकार्यकारी पदावर बदली, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची, परिसेविका ज्योती भारसकर यांच्यावर निलंबनाची तर कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलडुके आणि शुभांगी साठवणे यांच्यावर सेवा समाप्तीची तसेच कंत्राटी बालरोगतज्ज्ञ डॉ. सुशील अंबादे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.  

या दुर्घटनेचा बोध घेऊन राज्य शासनाच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसात हेल्थ ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून आरोग्यसंस्थांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना पत्र देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री म्हणाले, चौकशी समितीच्या अभिप्रायानुसार एसएनसीयूमधील इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आग लागल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. या दुर्दैवी घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. नागपूर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या घटनेची चौकशी केली. त्यामध्ये या कक्षाची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि त्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

लोकमतने दिले होते वृत्त
भंडारा अग्निकांडप्रकरणाचा अहवाल सादर केल्याचे वृत्त लोकमतने २१ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. त्या वृत्तावर आजच्या कारवाईने शिक्कामोर्तब झाले आहे.

Web Title: Bhandara fire Civil surgeon finally suspended; Replacement of one, termination of service of three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.