शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

स्वच्छ भारत मिशनमध्ये राज्यात भंडारा अव्वल, यवतमाळ जिल्हा अखेरच्या ३४ व्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 5:51 PM

स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य पातळीवरील रँकिंगमध्ये सद्यस्थितीत भंडारा जिल्हा अव्वल स्थानी, तर शेवटच्या ३४ व्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. अभियानात प्रथम व शेवटच्या स्थानावर असलेले दोन्ही जिल्हे हे विदर्भातीलच आहे.

गजानन मोहोडअमरावती : स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य पातळीवरील रँकिंगमध्ये सद्यस्थितीत भंडारा जिल्हा अव्वल स्थानी, तर शेवटच्या ३४ व्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. अभियानात प्रथम व शेवटच्या स्थानावर असलेले दोन्ही जिल्हे हे विदर्भातीलच आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले जाते. राज्यात यापूर्वी पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार २ आॅक्टोबर २०१४ नंतर शौचालय बांधून त्याचा वापर करणा-यांना १२ हजार व त्यापूर्वी बांधकाम झालेल्या शौचालयांना ४,५०० रुपये अनुदान दिले जाते, तर दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, स्त्री कुटुंबप्रमुख व अपंग यांना प्राधान्य दिले जाते. सोमवारी विभागीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, अभियानाच्या राज्यस्तरीय गुणांकनात भंडारा जिल्हा अव्वलस्थानी आहे. या जिल्ह्यात २ लाख ७ हजार ६२६ कुटुंबसंख्या आहे. यामध्ये पायाभूत सर्वेक्षणानंतर ८६ हजार ५५४ शौचालयांचे बांधकाम करण्यात आलीत. आता जिल्ह्यात एकूण २ लाख ८ हजार १७९ घरामध्ये शौचालये आहेत. त्यामुळे येथे शौचालय बांधकाम शिल्लक नसल्याचे स्वच्छ भारत अभियानाच्या जिल्हास्तरीय गुणांकनाच्या अहवालात स्पष्ट आहे. याच अहवालात यवतमाळ पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात एकूण कुटुंबसंख्या ४ लाख २६ हजार ४४८ आहे. ३५७ सार्वजनिक शौचालये आहेत. पायाभूत सर्वेक्षणानंतर १ लाख ९५ हजार ६८२ शौचालये बांधण्यात आली. सद्यस्थितीत २ लाख ९५ हजार ५२० कुटुंबाकडे शौचालय आहे, तर १ लाख ३० हजार ९२८ कुटुंबाकडे नसल्याचे या अहवालात स्पष्ट आहे.

वेळेवर निधीच उपलब्ध नाही-स्वच्छ भारत योजनेंतर्गत शौचालयाचा निधी बांधकामानंतर मिळतो. मात्र, अनेक कुटुंबांना शौचालयाचे बांधकामे केल्यानंतरही निधी मिळालेला नाही. १२ हजार रुपयांच्या तुटपुंज्या अनुदानात शौचालयाचे बांधकाम होणे शक्य नाही. त्यात रेतीघाटाचा हर्रास नसल्याने महागडी रेती; सिमेंट व साहित्याचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पदरमोड करावी लागत आहे.राज्यातील जिल्हानिहाय रँकिंग -स्वच्छ  भारत मिशनच्या गुणांकनानुसार भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, जालना, कोल्हापूर, नागपूर, उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, अकोला, बीड, लातूर, हिंगोली, अमरावती, अहमदनगर, वाशिम, गडचिरोली, परभणी, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नांदेड, बुलडाणा, नंदुरबार, जळगाव व शेवटच्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान