Beware, oxygen-carrying vehicle got status ofambulance; New rules apply in the state | खबरदार, ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनास रस्ता दिला नाही तर; राज्यात नवा नियम लागू

खबरदार, ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनास रस्ता दिला नाही तर; राज्यात नवा नियम लागू

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आजघडीला कोरोनाचा संसर्ग अनेक ठिकाणी वाढत असून, ऑक्सिजनची कमतरताही भासत आहे. परिणामी विविध वाहनांच्या माध्यमातून ऑक्सिजन वाहून नेला जात आहे. मात्र ऑक्सिजन वाहून नेताना त्या वाहनास टोलनाक्यांसह कुठेही अडविण्यात येऊ नये. त्या वाहनास टोल आकारला जाणार नाही, अशा आशयाचे निर्देश देण्यात आले आहेत.


राज्यातील सर्व टोलनाक्यांना हे निर्देश लागू आहेत.  महामार्गावरून ही वाहने जातील तेव्हा टोलनाक्यांवर त्यांना थांबविण्यात येऊ नये. यात टँकर किंवा सिलिंडर वाहून नेत असलेल्या वाहनांचा देखील समावेश आहे. या सगळ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा आहे. त्यांना वेगाने सोडावे. कोणत्याही प्लाझावरून याबाबतचे वाहन विनाअडथळा पास व्हावे; असे निर्देश देण्यात आले आहेत. जिथे ऑक्सिजन घेऊन जात आहे, त्या वाहनास टोल आकारला जाणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोल विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक कमलाकर फंड यांनी दिली. या वाहनांना अॅम्बुलन्ससारखा रस्ता द्यावा लागणार आहे.

राज्याच्या सीमेवरही 
हे निर्देश लागू
nमोठे टँकर हे २० टन किंवा पंधरा टनाचे असतात. त्यांना अनेक वेळ महामार्गावर थांबविले जाते. मात्र रुग्णवाहिकेला ज्याप्रमाणे थांबविले जात नाही त्याप्रमाणे या वाहनांही थांबवू नये. 
nतातडीने ऑक्सिजन वाहून नेता यावा म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या सीमेवरही हे निर्देश लागू होतील. कारण राज्याबाहेरून देखील ऑक्सिजन मागविला जात आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Beware, oxygen-carrying vehicle got status ofambulance; New rules apply in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.