‘तीन पत्ती’वरही होतेय बेटिंग!
By Admin | Updated: March 22, 2015 01:02 IST2015-03-22T01:02:14+5:302015-03-22T01:02:14+5:30
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात बेटिंग झाल्याची चर्चा सुरू आहे़ असे असतानाच स्मार्टफोनवर तीन पत्ती या गेममध्ये नवे सॉफ्टवेअर अपडेट झाले असून, त्यातून सामन्यावर बेटिंग लावली जात आहे.

‘तीन पत्ती’वरही होतेय बेटिंग!
अमरावती : क्रिकेटचा महासंग्राम असलेल्या वर्ल्डकपला मोठ्या दिमाखात सुरुवात झाल्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात बेटिंग झाल्याची चर्चा सुरू आहे़ असे असतानाच स्मार्टफोनवर तीन पत्ती या गेममध्ये नवे सॉफ्टवेअर अपडेट झाले असून, त्यातून सामन्यावर बेटिंग लावली जात आहे. याची किंमत आणि तीव्रता कमी असली तरी लहान मुलांच्या हातातील या स्मार्टफोनमुळे भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी त्याद्वारे बेटिंग सुरू केल्याने त्यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते़
आॅटोमॅटिक 'अपडेट' : स्मार्ट फोनमध्ये ज्यांच्याकडे तीन पत्ती हा गेम आहे, त्यांच्या मोबाइलमध्ये वर्ल्डकपसाठीचे बेटिंग सॉफ्टवेअर आॅटोमॅटिक डाऊनलोड होते. हे अॅप्लिकेशन स्मार्ट फोनवर डाऊनलोड होत असून, कुणालाही फोनाफोनी न करता इथे बेटिंगचा भाव कळतो आणि सट्टाही लावला जातो. बेटिंगचा पारंपरिक डाव मोडून अनेकांनी ही आॅनलाइन बेटिंग सुरू केली आहे. लहान मुलेही त्यात मागे नाहीत.
आॅनलाइन बेटिंग
च्आॅनलाइन क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून सट्टेबाजाराला मध्यस्थ न ठेवता यात बेटिंग लावता येते. भारतातल्या कुठल्याही बँकेद्वारे त्यावरील देवाण-घेवाण हे कार्ड नियंत्रित करते. मोबाइलमध्ये जेवढे चीप्स शिल्लक असतील तेवढा सट्टा लावता येतो आणि जिंकलेले चीप्स दुसऱ्याला विकण्यासाठीही वेगवेगळ्या युक्ती या सट्टेबाजांकडून लढविली जात आहेत.
जुगारात मुलांचेही वाढले प्रमाण
च्लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन आल्यामुळे आता त्यांनाही सट्टा लावायची सवय लागत आहे. आधी सट्टा हा फक्त मोठ्या लोकांचाच खेळ समजला जायचा; परंतु आता कालौघात छोट्या रकमेचेही सट्टे लावले जाऊ लागल्याने त्याची व्याप्ती वाढत आहे. त्यातच स्मार्टफोनने तर लहान मुलांनाही यात ओढले असून, भविष्यात सट्ट्याचे प्रमाण यामुळे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या गेम्सवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान पोलीस दलासमोर आहे.
या सॉफ्टवेअरमध्ये नेटवर्क 'नो प्रॉब्लेम'
च्भारतात बेटिंग हा गुन्हा असला, तरी पाश्चिमात्य देशांमध्ये त्याला अधिकृत परवानगी आहे. बेटिंगचे दर पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरूनच येतात. बाहेरील सट्टाबाजारासारखे येथे सट्ट्याचे दर जाणून घेण्यासाठी कुठेही फोनाफोनी करावी लागत नाही. तसेच एखादी विकेट गेली किंवा चौकार, षटकार ठोकला गेला, तर बेटिंगच्या दरामध्ये होणारे चढ-उतार येथे नसतात. यात केवळ सामना कोण जिंकणार यावरच सट्टा लावला जातो. नेटवर्कचा प्रॉब्लेम या सॉफ्टवेअरमध्ये येत नाही. केवळ चलन असेल, तर पाहिजे तेवढे सट्टे यात लावले जातात.