संगणकापेक्षा मेंदूच जलद

By Admin | Updated: June 28, 2016 02:06 IST2016-06-28T02:06:23+5:302016-06-28T02:06:23+5:30

६ ते १३ वयोगटातील मुलांनी ‘अ‍ॅबेकस’चा वापर करून कठीण गणिते सोडवून दाखविली.

Better speed than computer | संगणकापेक्षा मेंदूच जलद

संगणकापेक्षा मेंदूच जलद


मुंबई : ६ ते १३ वयोगटातील मुलांनी ‘अ‍ॅबेकस’चा वापर करून कठीण गणिते सोडवून दाखविली. मेंदू विरुद्ध संगणक - कॅल्क्युलेटर अशा थेट झालेल्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून, लहान वयात अ‍ॅबेकस शिकण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
शनिवारी सीबीएस एज्युकेशन या संस्थेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यादरम्यान हा उपक्रम पार पडला. या वेळी संस्थेचे सी.डी. मिश्रा, भानू राजपूत आणि संजय भोईर या संचालकांसह अ‍ॅबेकस पद्धतीत यश मिळविलेले विद्यार्थीही उपस्थित होते. याप्रसंगी, १८ वर्षीय साहिल शहा म्हणाला की, अ‍ॅबेकसच्या भक्कम शिकवणीमुळे आयसीएसईच्या परीक्षेत संपूर्ण देशात तिसरे स्थान मिळविता आले.
राहुल जैन हा आयआयटी रुकरीचा विद्यार्थी असून, त्याने अल्पवयीन डीग्री करून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक आणि फिजिक्समध्ये बी.टेक केले आहे. त्यानेही अ‍ॅबेकसच्या प्रशिक्षणाचे योगदान आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. यानंतर, अवघ्या ६ वर्षांच्या मुस्कान तेकचंदानी हिने कठीण असलेली गणिते काही सेकंदांत सोडवून दाखविली.
या उपक्रमाविषयी सी.डी. मिश्रा म्हणाले की, बौद्धिक, गणनपद्धती जलद आणि अचूकपणे करण्यास शिकल्यामुळे मल्टीटास्किंग, वेळेचे व्यवस्थापन, स्मृती, एकाग्रता आणि मानसिक क्षमता विकसित
झाली आहे. अ‍ॅबेकसचे प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये हे कौशल्य दिसून येते. अ‍ॅबेकसचे प्रशिक्षण म्हणजे केवळ
गणित सोडविणे नसून एखाद्या घटनेकडे वस्तुनिष्ठपणे पाहता येते. (प्रतिनिधी)

Web Title: Better speed than computer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.